Advertisement

'हे' ७ व्यायाम प्रकार तुमचं आयुष्य करतील सुखकर

जीमला जायचा कंटाळा येत असेल किंवा काही कारणास्तव जीमला जाणं शक्य होत नसेल तर हे ७ व्यायाम प्रकार तुम्ही घरच्या घरी करा. यापैकी दिवसाला एक तरी व्यायाम प्रकार केलात तरी चांगले परिणाम होतील.

'हे' ७ व्यायाम प्रकार तुमचं आयुष्य करतील सुखकर
SHARES

आपल्यापैकी अनेक जण जीम जात असतील. काही योगा करत असतील. पण जीम आणि योगा करणं सर्वांनाच शक्य असतं असं नाही. मग तुमच्यासाठी आम्ही काही खास व्यायाम प्रकार घेऊन आलो आहोत जे तुम्ही सहज घरच्या घरी करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यायची देखील गरज नाही. सर्वात महत्त्वाचं या व्यायाम प्रकारामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. खास करून मधुमेहींना याचा अधिक फायदा होईल


चालणंचालणं हा सर्वात सोपा व्यायाम प्रकार आहे. दिवसातून २५ ते ३० मिनिटं चालणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सकाळी उठल्यावर कमीत कमी ३० मिनिटं आणि रात्री जेवल्यानंतर १० मिनिटं चालणं उत्तम आहे. तुम्ही जितकं फास्ट चालाल तितकं तुमच्या शरीरातील शर्करेचं प्रमाण कमी होईल. सुरुवातीला हळूहळू चाला. मग तुम्ही स्पीड वाढवू शकता.


पळणंतुम्हाला एकदा स्पीडमध्ये चालायची सवय झाली की तुमचा स्टॅमिना वाढेल. मग तुम्ही धावायला देखील सुरुवात करा. यामध्ये हृदयाची गती खूपच जलद होऊन शरीराला ऑक्सिनयुक्त रक्त पुरवठा होऊ लागतो. त्यामुळे सुरुवातीला आठवड्यातून दोन ते तीन दिवस पळा. सुरुवातीला हळूहळू पळावे


सायकल चालवणंसायकल चालवणं हा देखील एक चांगला पर्याय आहे. रोज ३० मिनिटं सायकलिंग केल्याचे चांगले फायदे होतात. शरीरावाटे जास्त घाम निघाल्यानं तुमच्या शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी होईल. याशिवाय तुमचं वजन देखील घटेल.


योगा


वजन कमी करण्यासोबतच रक्तशर्करारक्तदाब आणि मानसिक ताण या समस्यांवर योगासन हा रामबाण उपाय आहेसुरुवातीला कठीण योगासनं न करता सोपी योगासनं करावीत. ही योगासनं तुम्ही योगा ट्रेनरच्या देखरेखीत करावीत


डान्सडान्स हा देखील व्यायामाचा एक प्रकार आहे. झुंबा, हिप हॉप, टर्बो जॅम असे अनेक पर्याय डान्समध्ये उपलब्ध आहेत. डान्समुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी घटते. शिवाय शरीरातून घाम निघून शर्करेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.


पायऱ्या चढणंहल्ली प्रत्येक ठिकाणी लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे.त्यामुळे आपण पायऱ्याने चढ-उतर करत नाही. पण जर तुम्ही लिफ्टच्या बदल्यात पायऱ्यांचा वापर केला तर उत्तम. कारण पायऱ्यांवरून चढ-उतर करून स्नायूंचा चांगला व्यायाम होतो


पोहणेपोहायला सर्वांनाच जमतं असं नाही. पण तुम्ही यासाठी क्लास लावू शकता. शिकण्यासोबतच तुमचा चांगला व्यायामदेखील होईल. पोहण्यामुळे शरीरातील प्रत्येक स्नायूची हालचाल होईल. यामुळे शरीरातील मेद आणि कॅलरीज घटण्यास मदत होईल. यासोबत रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होईलहेही वाचा

पोटाचा घेर कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ फायदेशीर

ऑफिसमध्ये असताना अशी घ्या आरोग्याची काळजी!
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा