Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

ऑफिसमध्ये असताना अशी घ्या आरोग्याची काळजी!


ऑफिसमध्ये असताना अशी घ्या आरोग्याची काळजी!
SHARES

रोजच्या धावपळीत अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. त्यातच दिवसाचे सर्वात जास्त तास आपण ऑफिसमध्ये घालवतो. दिवसेंदिवस आपलं ऑफिस कल्चरदेखील बदलत चाललं आहे. ऑफिस हे जणू आपलं दुसरं घरंच बनतं. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तर आपण दिवसाचे ८ ते १० तास एकाच जागेवर बसलेले असतो. एकाच ठिकाणी खूप तास बसणं हे आरोग्यासाठी घातक असतं. सतत एकाच जागी बसणं आणि संगणकाच्या स्क्रीनवर बघणं आरोग्यासाठी वाईट आहे. पण अशात ऑफिसमध्ये आपले आरोग्य कसं सांभाळावं यासाठी काही खास टिप्स...


चहा, कॉफीचं सेवन टाळा

८ ते १० तास काम करण्यासाठी एनर्जी राहावी म्हणून काही ऑफिसची मंडळी चहा आणि कॉफीचं वारंवार सेवन करताना दिसतात. चहा आणि कॉफीच्या सततच्या सेवनाने दात किडतात शिवाय ऍसिडिटीसुद्धा होते. चहा आणि कॉफीला पर्याय म्हणून आपण ग्रीन टी किंवा वॉर्म वॉटर घेऊ शकतो.

लंचची ठराविक वेळ पाळा :

कामाच्या प्रेशरमध्ये आपण कित्येकदा जेवण किती वाजता करतो याचं भान राहत नाही. परिणामी आपल्याला लठ्ठपणा, अस्वस्थपणा, आळशीपणा या समस्यांना सामोरे जावं लागतं. म्हणून १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान जेवण करणं आवश्यक आहे. जेवणानंतर किमान १५ मिनिटे वॉक करणे गरजेचं आहे.

पाणी पिण्याची स्मार्ट पद्धत :

कामाच्या गोंधळात आपण पाणी प्यायला विसरतो. पण पाणी दिवसभरात किमान ३ लिटर पाणी प्यावं. जास्तीत जास्त पाणी प्यायचं असेल तर आकर्षक पाण्याची बॉटल घ्यावी आणि आपण बसतो त्या ठिकाणी ठेवावी. जेणेकरून जेव्हा जेव्हा आपल्यासमोर ती बाटली दिसेल तेव्हा तेव्हा आपण पाणी पिऊ.


दर अर्ध्या तासाने वॉक :

एकाच जागी बसून आपल्या पाठीच्या कण्यावर आणि मानेवर ताण येतो. म्हणूनच दर अर्ध्या तासाने आपण आपल्या जागेवरून उठून थोडंसं चालावं. कोणत्याही कामासाठी आपल्यासह कर्मचाऱ्याला जागेवरूनच फोन करण्याऐवजी आपण आपल्या जागेवरून उठून त्याच्याकडे जाऊन संवाद साधावा. त्याकारणाने आपला व्यायाम देखील होईल.

डोळ्यांवर पाणी मारणे :

एकटक संगणक आणि मोबाईलच्या स्क्रीनवर पाहत राहिल्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो. याला उपाय म्हणून डोळ्यांवर आणि तोंडावर पाणी मारावं. त्यामुळे डोळ्यावर आलेला ताण कमी होईल.


म्युझिक थेरपी :

ऑफिसमध्ये आपल्याला नेहमीच कामाचं टेन्शन असतं. असाइन्मेंट आणि टार्गेट यामुळे ताण येतो. म्युझिक थेरपी मुले स्ट्रेसमध्ये असलेला माणूस शांत होऊ शकतो. आपल्या रोजच्या स्ट्रेसफुल वातावरणातून ब्रेक घेऊन १० मिनीटे एखादं सॉफ्ट म्युझिक ऐकून परत कामाला सुरुवात करावी, त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटून परत काम करण्यासाठी एनर्जी मिळेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा