Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

पोटाचा घेर कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ फायदेशीर

चीज आणि दुध यामुळं आपलं पोट सुटणं थांबू शकतं. काकडीसोबतच टरबूज, द्राक्षे आणि अननस यामुळेदेखील पोटाची चरबी कमी करता येते.

पोटाचा घेर कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ फायदेशीर
SHARES

महिला असो वा पुरुष हल्ली अनेकांच्या पोटाचा घेर वाढत चालला आहे. व्यायाम करा, डाएट करा किंवा आणखी काही करा पण हे पोट काही कमी होत नाही. पण व्यायाम आणि डाएटसोबत तुम्ही आणखी काही पदार्थ खाल्ले तर पोटाचा घेर कमी होण्यास नक्कीच मदत होईल. आम्ही तुम्हाला असे पदार्थ सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं पोट कमी करण्यास मदत करेल.


१) चीज आणि दुध यामुळं आपलं पोट सुटणं थांबू शकतं. पण दही जास्त फायदेशीर आहे. कारण दही हे चांगले जीवाणू तयार करतात. यामुळे आपल्या आतड्यातील अन्नप्रक्रिया चांगल्या प्रकारे होते. परिणामी तुमच्या पोटाचा घेर हळूहळू कमी होतो.


२) जास्त प्रमाणात पाणी पिल्यानं किंवा जास्त पाणी असलेल्या भाज्या खाल्ल्यानं तुमचं सुटलेलं पोट कमी होऊ शकतं. काकडीमुळं तुमचं पोट साफ होतं. काकडीसोबतच टरबूज, द्राक्षे आणि अननस यामुळेदेखील पोटाची चरबी कमी करता येते. अननसामध्ये पोटॅशियम असते. त्याच्या सेवनानं पोटातील पाणी संतुलित राहतं. त्यामुळे पोट कमी करण्यासाठी अननस आवर्जुन खावं.३) केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. केळी जर तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ली तर तुमचं सुटलेलं पोट आटोक्यात येईल.


४) ओट्समध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. नाष्ट्याला जर तुम्ही ओट्स खाल्ले तर गॅस आणि बद्धकोष्ठताची समस्या दूर होते. त्यामुळे तुमचं पोटही सुटत नाही.


५) पोटाच्या दुखण्यावर आलं हे फायदेशीर आहे. पोट फुगलं असेल तर आल्याचा रस किंवा आल्याचा छोटा तुकडा तोंडात ठेवावा. याशिवाय तुम्ही जेवणात आल्याची पेस्ट वापरू शकता. आलं आतड्यांना साफ करण्याचं काम करते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. अर्थात पोटाचा घेर कमी करण्यास याची मदत होते.हेही वाचा

पोटाचा घेर कमी करायचाय? मग ही ७ योगासनं करा...
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा