पोटाचा घेर कमी करायचाय? मग ही ७ योगासनं करा...

वाढलेल्या वजनाइतकीच त्रासदायक ठरते पोटावरची वाढीव चरबी. ही चरबी अनेकांची डोकेदुखी ठरते. ती कमी करायची असेल तर त्यासाठी काही खास उपाय करणं गरजेचं आहे. पोट कमी करण्यासाठी काही सोपी योगासनं आहेत. ही योगासनं नियमितपणे केली, तर पोटाचे फॅट कमी करता येतील.

  • पोटाचा घेर कमी करायचाय? मग ही ७ योगासनं करा...
  • पोटाचा घेर कमी करायचाय? मग ही ७ योगासनं करा...
  • पोटाचा घेर कमी करायचाय? मग ही ७ योगासनं करा...
  • पोटाचा घेर कमी करायचाय? मग ही ७ योगासनं करा...
  • पोटाचा घेर कमी करायचाय? मग ही ७ योगासनं करा...
  • पोटाचा घेर कमी करायचाय? मग ही ७ योगासनं करा...
  • पोटाचा घेर कमी करायचाय? मग ही ७ योगासनं करा...
SHARE

दिवसेंदिवस लठ्ठपणा ही समस्या तरूण आणि तरूणींमध्ये वाढताना दिसतेय. वाढलेल्या वजनाइतकीच त्रासदायक ठरते पोटावरची वाढीव चरबी. ही चरबी अनेकांची डोकेदुखी ठरते. ती कमी करायची असेल तर त्यासाठी काही खास उपाय करणं गरजेचं आहे. पोट कमी करण्यासाठी काही सोपी योगासनं आहेत. ही योगासनं नियमितपणे केली, तर पोटाचे फॅट कमी करता येतील.


१) बोट मुद्रा

पाठीवर झोपा. दोन्ही पाय आणि डोक्याकडचा भाग एकदाच वर उचलून व्ही शेप बनवा. १० सेकंद तसेच थांबा. कमीत कमी १० वेळा हे आसन रिपीट करा.
२) मंडुकासन

वज्रासनच्या पोझिशनमध्ये बसा. दोन्ही हाताचे अंगठे मधे घेऊन मूठ बंद करा. आता दोन्ही मूठी नाभीच्या आजूबाजूला लावून श्वास सोडून खाली वाका आणि हनुवटी जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ याच पोझिशनमध्ये थांबा. असं ५ मिनिटं करा.३) पवनमुक्तासन

पाठिवर झोपा. पाय वाकवून छाती जवळ आणा. शरीराचा वरचा भाग थोडा वर उचला. आता हातांनी गुडघे पकडा आणि नाकाजवळ नेण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ या पोझिशनमध्ये राहा. कमीत कमी ५ वेळा तुम्ही ही पोझिशन रिपीट करा.४) अर्धपवन मुक्तासन

पाठिवर झोपा. डावा पाय वाकवून छातीजवळ आणा. शरीराचा छातीकडचा भाग थोडा वर उचला. थोडा वेळ याच पोझिशनमध्ये राहा. सेम पोझिशन दुसऱ्या पायासोबत करा. ५ वेळा ही प्रक्रिया करा.५) कपालभारती प्राणायम

पद्मासनाच्या मुद्रेत बसा. दीर्घ श्वास आत घेताना पोट देखील आत घ्या. श्वास सोडताना पोट बाहेर सोडायचं. २ मिनिटं ही क्रिया करा.


६) सर्वांगासन

पाय सरळ ठेवून पाठिवर झोपा. पाय न वाकवता वर उचला. कोपरांच्या मदतीनं कंबर आणि पाठ वर उचलून ९० डिग्रीचा अँगल बनवा. थोडा वेळ त्याच पोझिशनमध्ये थांबा. पुन्हा हळूहळू सामान्य पोझिशनमध्ये या. असे ८ ते १० वेळा करा. सुरुवातीला थोडा त्रास होईल. पण नियमित केल्यास तुम्ही आरामात हे आसन करू शकाल.७) हलासन

पाय सरळ ठेवून पाठिवर झोपा. आता पाय हळूहळू वर उचलून डोक्याच्या वरच्या बाजूच्या जमिनीला टेकवा. थोडा वेळ थांबल्यानंतर पुन्हा पहिल्या पोझिशनमध्ये या. ही क्रिया ८ ते १० वेळा करा.हेही वाचा

लठ्ठपणा हा आजार - सोशल मीडियामुळे वजन कमी करण्याकडे भर


संबंधित विषय
ताज्या बातम्या