ही हटके योगासनं करुन पहाच!

 Mumbai
ही हटके योगासनं करुन पहाच!
Mumbai  -  

तणाव आणि मानसिक रोग या आजारांना दूर ठेवण्यासाठी योगा हा उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ तर होतेच, शिवाय शरीरातील हार्मोन्स नियंत्रित राहतात. त्यामुळे रोज योगा करणं आवश्यक आहे. आवश्यक म्हण्यापेक्षा सध्या योगा करणं हे गरजेचं झालं आहे. कोणत्या प्रकारची योगासनं आहेत हे सर्वांनाच माहिती असेल. योगाचे काही हटके प्रकारही अस्तित्वात आहेत!


न्यूड योगा

न्यूड योगा म्हणजे निर्वस्त्र होऊन केली जाणारी योगासनं. न्यूड योगाचा जन्म भारतातच झाला. पण सध्या न्यूड योगा पाश्चात्त्य देशांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. न्यूयॉर्कमध्ये २൦൦१ साली अॅरेन स्टार्स या व्यक्तीनं हॉट न्यूड योगाचे क्लास घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर युरोपमध्ये न्यूड योगा प्रचलित झाला.


डॉग योगा

यात डॉगीसोबत योगा करता येतो. तसेच डॉगीला आणि त्याच्या ओनरला मसाज सेशन दिले जातात. त्यामुळे मनाला शांती मिळते. थकवा दूर होऊन शरीरात ऊर्जा निर्माण होते.


बीअर योगा

योगाचे आसन करता करता तुम्ही बीअर पिऊ शकता. या योगाची सुरुवात जर्मनीतल्या बर्लिन येथे झाली. यामध्ये योगाच्या प्रत्येक आसनासोबत बीअर पिता येते. यामुळे रिलॅक्स वाटते, असं मानलं जातं.


गांजा योगा

अमेरिकेमध्ये हा योगा प्रसिद्ध आहे. अमेरिकेच्या काही भागात गांजा कायदेशीररित्या विकला जातो. त्यामुळे तिथे असलेल्या योगा क्लासेसमध्ये योगासोबत गांजा वापरला जातो.


एरियल योगा

एरियल हॅमॉक म्हणजेच झोपाळ्यासारख्या रस्सीवर लटकून वेगवेगळी आसनं केली जातात. शरीराचं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी या योगाचा जास्त उपयोग होतो.

Loading Comments