1000 नौसैनिकांचा 'आयएनएस विराट'वर विराट योगा!

Mumbai  -  

आयएनएस विराट..तब्बल एक हजार सैनिक...नेहमीच्याच शिस्तीर उभे राहिलेले...आणि त्यांना कमांड देणारा एक आवाज...तुम्हाला वाटेल की एखाद्या युद्धनौकेवरचं हे नेहमीचंचं चित्र असावं. चित्र जरी नेहमीचंच असलं, तरी त्याचं कारण मात्र वेगळं होतं. हे एक हजार सैनिक आयएनएस विराटवर कोणत्याही युद्धसरावासाठी एकत्र आले नव्हते किंवा त्यांना कमांड देणारा आवाज हा कोणत्याही सैनिकी अधिकाऱ्याचा नव्हता. इतक्या मोठ्या संख्येने हे सैनिक जमले आहेत ते आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यासाठी.

बुधवारी अर्थात 21 जून रोजी नेव्हीच्या प्रत्येत नौकेवर आणि सेंटरवर मिळून तब्बल दहा हजार नौसैनिकांनी मिळून योगा केला. यावेळी वेस्टर्न नेवल कमांडचे कमांडिंग इन चिफ वाइस अॅडमिरल गिरीश लुथ्रा हेसुद्धा आयएनएस विराटवर उपस्थित होते.


पूर्ण वर्षभर अशाच प्रकारची शिबिरं नौसैनिकांसाठी आयोजित केली जातात. यासाठी नैसेनेतील विशेष इन्स्ट्रक्टर्सची नेमणूकही करण्यात आली असून त्यासाठी योगाचे प्रशिक्षण देण्याऱ्या इतरही संस्थांची मदत घेतली जात आहे. योगामुळे शारिरीक आणि मानसिक फिटनेस उत्तम राहण्यास मदत होते आणि त्याची सैन्यात अधिक गरज असते.

- वाईस अॅडमिरल गिरीश लुथ्रा, कमांडिंग इन चिफ, वेस्टर्न नेवल कमांड

सैन्यातील जवानांसाठी योगा किती महत्त्वाचा आहे याबद्दल गिरीश लुथ्रा यांनी मांडलेली भूमिका किती सार्थ आहे याचाच प्रत्यय इंडो-तिबेट बॉर्डरवर योगा करणाऱ्या सैनिकांनी घडवून दिला. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.हेही वाचा

योगा दिनानिमित्त मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा सल्ला

लहान मुलांसाठी योगाचे 9 फायदे


Loading Comments