योग दिनानिमित्त मुंबई पोलिसांचा सल्ला

 Mumbai
योग दिनानिमित्त मुंबई पोलिसांचा सल्ला
Mumbai  -  

योग करताना जे नियम बंधनकारक असतात, जी शिस्त असते, ती पाळली तरच त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे ट्रॅफिक नियमांचे पालन केले तर, ट्रॅफिकची अवस्था नक्कीच सुधारेल असे म्हणत मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांनी 'अनुष आसन' नावाचे आसन योगदिनाच्या दिवशी मुंबईकरांना ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.  

हे देखील वाचा - घाटकोपरमध्ये दुचाकीस्वाराची दादागिरी, वाहतूक पोलिसावरच हल्ला

21 जून म्हणजेच योगदिन. या निमित्ताने मुंबईतल्या विविध ठिकाणी योगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांच्या वतीने विविध पोलिस ठाण्यातही योगाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

ट्रॅफिक नियमांचे पालक केल्याने अपघात टळेल आणि त्यामुळे तुमचे जीवन सुरक्षित होईल. लोकांनी ट्रॅफिक नियमांचे पालन करावे असा सल्ला यावेळी मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला.

Loading Comments