योगदिन विशेष : लहान मुलांसाठी योगाचे 9 फायदे

Mumbai
योगदिन विशेष : लहान मुलांसाठी योगाचे 9 फायदे
योगदिन विशेष : लहान मुलांसाठी योगाचे 9 फायदे
योगदिन विशेष : लहान मुलांसाठी योगाचे 9 फायदे
योगदिन विशेष : लहान मुलांसाठी योगाचे 9 फायदे
योगदिन विशेष : लहान मुलांसाठी योगाचे 9 फायदे
See all
मुंबई  -  

शाळेत पीटीचा तास आला आणि व्यायाम प्रकार करावे लागले तर अनेक लहान मुले नाक मुरडतात. योगा म्हटल्यावर तर ही छोटी मुले आपला हातच दुखतो किंवा पायच दुखतो अशी कारणेही आपल्या शिक्षकांना देतात. पण, लहानपणापासूनच मुलांना योगा किंवा व्यायाम शिकवणे किती महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला माहीत असेलच. आता तर 21 जून या योगदिन साजरा करायला सुरुवात झाल्यापासून अनेक शाळांमध्ये पीटीचे शिक्षकही मुलांना अभ्यासात नियमितपणे योगासनांचे प्रशिक्षण देऊ लागले आहेत.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. पण, या आजारांचा उपचारही महागला आहे. औषधांपेक्षाही योगामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवून कुठल्याही रोगावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. कारण, योगासनांमुळे शरीरांतर्गत प्रक्रियांमध्ये सुधारणा घडून येतात आणि मेंदूची क्षमता वाढते. मानसिक आरोग्यावरही त्याचा अनुकूल परिणाम होतो. नैराश्य, ऑटिझमसारख्या मानसिक समस्यांवरही योगासने दुसऱ्या कुठल्याही औषधांपेक्षा जास्त प्रभावी आहेत, असे योगाभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महापालिका रुग्णालयांतही डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णांसाठी योगभ्यासाचे आयोजन करण्यात येते.


लहान मुलांसाठी योगाचे महत्त्व?

  • बौद्धिक क्षमता वाढते
  • अभ्यासात त्यांना फायदा होईल
  • लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल
  • लहान मुलांचा रक्तदाब नियंत्रित राहील
  • त्यांचं वजन नक्कीच कंट्रोल मध्ये राहू शकते
  • मुलं आजारी प़डत नाही, आनंदी राहतात
  • एकाग्रता, स्मरणशक्ती, त्यांच्या सवयीं बदलतात
  • अभ्यासातली भीती कमी होते. विश्वास वाढतो
  • उदासीनता घालवण्यासाठी होते मदत

लहान मुलांना आधीपासूनच जर योगासनांची सवय आणि आवड लावली तर, त्यांना अभ्यासात आणि भविष्यात नक्कीच फायदा होईल. लहान मुलांना प्राणायम, पोट हलवणं, श्वासोच्छवास चांगल्या पद्धतीने करणं असे प्रकार शिकवले जातात. याशिवाय, नोकरी करणारी व्यक्ती असो किंवा स्वतंत्र व्यवसाय करणारी व्यक्ती. सध्या सगळ्यांचेच जीवन धकाधकीचे झाले आहे. लहान मुलांच्या दप्तराचे ओझे ही त्यांच्या वजनाचे एवढे असते. अगदी पहिल्या इयत्तेतील विद्यार्थीसुद्धा यातून सुटलेले नाहीत. तणाव नियंत्रणाचा योग विषयात अगदी मुळापासून विचार करण्यात आला आहे. पण, आयुष्यात योगाच्या माध्यमातून तणावाचे नियोजन करणे सहज शक्य झाले आहे.


10 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी ब्रह्मविद्या देणं सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. आठवड्यातून 2-3 तास जर ब्रम्हविद्या दिली तर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतावाढीस फायदा होतो. शरीराच्या आणि मनाच्या स्वास्थासाठी योग करणे हे गरजेचे आहे. योगसाधना आणि ब्रह्मविद्या ही महत्त्वाची गरज बनली आहे. त्यासाठी लहानपणापासूनच योगाचं महत्त्व मुलांना समजून दिलं पाहिजे.'

- डॉ. सुमन भांडेकर, ब्रह्मविद्या योग प्रशिक्षिका


केईएम रुग्णालयात दर बुधवारी आणि शुक्रवारी हायपरटेन्शन रुग्णांसाठी असलेल्या बाहृयरुग्ण विभागात योगासंदर्भात माहिती आणि प्रात्याक्षिके करून दाखवली जातात. योगाचे अनेक प्रकार आहेत. प्राचीन काळातील योगासनांसह आता ब्रह्मविद्या आणि पॉवर योगाही विकसित होऊ लागले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्तनाचा कर्करोग रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पण, अनेकदा रुग्ण पालिका रुग्णालयातील गर्दी पाहून उपचारासाठी येणे टाळतात. अशा स्थितीत खासकरून झोपडपट्टीतील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि योगाचे महत्त्व त्यांना पटावे, यासाठी मुंबईतील नायगाव आणि मालाड-मालवणी याठिकाणी हेल्थ केअर सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज किमान 40 रुग्ण उपचारांसाठी येतात. या रुग्णांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्या जाणून घेऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. औषधांसह त्यांना त्यांच्या आजारांनुसार योगासनेही शिकवली जातात.


- डॉ. मृदुला सोळंकी, सहयोगी प्राध्यापिका, जनऔषध शास्त्र विभाग, केईएम रुग्णालय


लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत कुठलीही व्यक्ती योग करूच शकते आणि प्रत्येकाने योगा हा केलाच पाहिजे. लहान मुलांकडे आपण बारकाईने पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की खेळता-खेळता ती सहज अनेक प्रकारची आसने करत असतात. लहान मुलांना आजार होऊ नये म्हणून त्यांना सहजसोपी आसने आणि प्राणायाम करायला हवा. गर्भवती महिलेने कुठल्या प्रकारची आसने करायला पाहिजेत, असा सल्लाही रुग्णांना दिला जातो. याशिवाय साधारण प्रसूतीनंतर तीन महिने आणि सिझेरियननंतरचे सहा महिने योग करू नयेत, असे रुग्णांना सांगितले जाते. तसेच हृदयरोगी व्यक्तींनी योगासने सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. सोलंकी यांनी म्हटले आहे.


वाशी येथे योग शिबिराचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यंदाच्या वर्षीही पालिका प्रशासनाद्वारे योग शिबीर भरवले जाणार आहे. याकरता वाशी येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पालिकेच्या केईएम, नायर आणि शीव या प्रत्येक रुग्णालयातून 100 लोक या शिबिरात सहभागी होणार आहेत. यात रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसह रुग्ण आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.


याच योगाचे महत्त्व ओळखून घाटकोपरच्या अभ्युदय विद्यालयात योगाचे वर्ग आयोजित केले होते. यावेळी शाळांमध्ये बच्चेकंपनी ही योगा करण्यात दंग होती.


योग अभ्यासामुळे शरीर, मन, बुद्धी आणि भावना यामध्ये समन्वय साधून चंचलता दूर करता येते. आजच्या या धावपळीच्या जीवनात ताणतणाव कमी करून आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते. स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर करून आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते. म्हणून या दिनी योग शास्त्रातील आसनांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
- आर. जी. हुले, संस्थापक, अभ्युदय विद्यालय


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.