Advertisement

'याच' वेळेत खा फळं-भाज्या, नाहीतर...

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्यात देखील अनेक बदल झाले. 'ना काळा ना वेळ' असं आपलं खाण्याच्या बाबतीत झालं आहे. फळ असो वा भाजी किंवा आणखी काही ते ठरलेल्या वेळेतच खाणं आवश्यक आहे. तर त्या खाण्यातून आपल्याला आवश्यक घटक मिळतील.

'याच' वेळेत खा फळं-भाज्या, नाहीतर...
SHARES

भूक लागली की आपण कधीही काहीही खातो. पण प्रत्येक पदार्थ कुठल्या वेळी खाल्ला पाहिजे याची माहिती असणं फार गरजेचं आहे. मग ती फळं असो कुठल्या भाज्या असो किंवा इतर काही असो. वेळेनुसार आपण खाल्लं तर ते शरीरासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे कधी काय खायचं? आणि त्याच्या तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


१) सफरचंद

'अॅन अॅप्पल अ डे, किप्स अ डॉक्टर अवे' हे आपल्याला नेहमीच सांगितलं जातं. पण म्हणून काही सफरचंद कधीही खायचं नसतं. सफरचंदाचं सेवन सकाळी नाष्ट्याच्या वेळेला करणं उत्तम आहे. यामध्ये पेक्टिन नावाचा तत्व असतो जो उच्च रक्तदाब (बिपी) आणि कोलेस्ट्रॉलला कमी करतो. 


डाएटवर असणारे रात्रीच्या जेवणात एक सफरचंद खातात किंवा काही जेवल्यानंतर सफरचंद खातात. रात्री सफरचंद खाल्ल्यानं पेक्टिनच्या पचनात अडचण येते. यामुळे अॅसिडिटीचा त्रास उद्भवतो.

कधी खावे : सकाळी

कधी खाऊ नये : संध्याकाळी, रात्री


२) केळी

केळीमुळं वजन वाढतं असा अनेकांचा समज आहे. पण योग्य वेळेत केळ्याचं सेवन केलं तर वजन वाढत नाही. केळी सकाळी उठल्यावर किंवा दुपारच्या जेवणानंतर खाल्लं तर उत्तम आहे. कारण सकाळी आपण उठतो तेव्हा आपल्या शरीरात उर्जा नसते. केळ्यामुळे तुम्हाला ती उर्जा मिळते.


सकाळी आणि दुपारी केळं खाण्याचा हा फायदा आहे की, दिवसभर आपण जे काम करतो त्यामुळे केळं सहज पचतं आणि आपल्याला उर्जा मिळते. याशिवाय शरीरात प्रतिरोधक क्षमता वाढते. रात्री जर केळ्याचं सेवन केल्यास अपचन होते.

कधी खावे : सकाळी, दुपारी

कधी खाऊ नये : संध्याकाळी, रात्री


३) संत्री

अनेक जण संत्री सकाळी नाष्ट्याला खातात. पण संत्री सकाळी तसंच रात्री न खाता संध्याकाळी खाणं आवश्यक आहे. संत्र्यामध्ये व्हिटामिन सी असते. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. सकाळी खाल्ल्यानं गॅसची समस्या उद्भभवते.


कधी खावे : संध्याकाळी

कधी खाऊ नये : सकाळी, दुपारी


४) कलिंगड

उन्हाळ्यामध्ये अनेक जण कलिंगड रात्री झोपताना खातात. पण तसं न करता कलिंगड सकाळी नाष्ट्याला किंवा दुपारी खाऊ शकता. कलिंगड पचायला हलका असते. तसंच त्यामध्ये पाण्याची क्षमता देखील अधिक असते. रात्री कलिंगड खाल्ल्यानं तुम्हाला वारंवार बाथरूमला होऊ शकते. त्यामुळे  तुमची झोपमोड देखील होण्याची शक्यता आहे. शिवाय कलिंगड रात्री पचायला देखील जड आहे.

कधी खावे : सकाळी, दुपारी

कधी खाऊ नये : रात्री


५) पपई

पपई सकाळी नाष्ट्याला किंवा संध्याकाळी खाऊ शकता. पपईमध्ये आम्ल कमी प्रमाणात असतं. त्यामुळे पपई चांगल्या प्रकारे पचते. पपई सकाळी नाष्ट्याला खाणं तुमच्या त्वचेसाठी पण चांगलं आहे. पपईमध्ये व्हिटामिन ए आणि सी आहे. पपई रात्री खाऊ नये. पपई पचायला हलकी असली तरी रात्री सेवन केल्यानं पोटाच्या समस्या निर्माण होतात.

कधी खावे : सकाळी, संध्याकाळी

कधी खाऊ नये : रात्री


६) कडधान्य

कडधान्य हे दुपारी आणि रात्री खाणं फायदेशीर आहे. कडधान्यांमध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं. दुपारी आणि रात्री खाल्ल्यानं तुमची पचनक्रिया सुधारते. शिवाय कोलेस्ट्रॉलची समस्या देखील दूर करते. सकाळी जर तुम्ही कडधान्य खाल्ले तर तुम्हाला अधिक भूक लागेल आणि तुम्ही अधिक खाल.


कधी खावे : दुपारी, रात्री

कधी खाऊ नये : सकाळी


७) बटाटा

बटाटा आणि त्यापासून तयार पदार्थ सकाळी खाणं फायदेशीर आहे. बटाट्यामुळे कॉलेस्ट्रॉल कमी होते आणि शरीराला योग्य उर्जा मिळते. यात हायकॅलरी असल्यानं रात्री सेवन करू नये. रात्री बटाटा खाल्ल्यानं वजन वाढण्याची समस्या होऊ शकते.


कधी खावे : सकाळी

कधी खाऊ नये : रात्री


८) दूध

डॉक्टर देखील सांगतात की, दुधाचं सेवन रात्री करणं योग्य आहे. रात्री कोमट दुधाचे सेवन केल्यानं चांगली झोप लागते. याशिवाय शरीरात एनर्जी राहते. सकाळी जर तुम्ही व्यायाम किंवा जास्त परिश्रमाचं काम करत असाल तर दुधाचं सेवन करा. कारण दुध हे पचण्यास जड असते.

कधी प्यावे : रात्री

कधी पिऊ नये : सकाळी, दुपारी


९) सुका मेवा

सुका मेवा सकाळी आणि दुपारी खाणं फायद्याचं आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. रात्री सुका मेवा खाल्ल्यानं वजन वाढते.

कधी खावे : सकाळी, दुपारी

कधी खाऊ नये : रात्री



हेही वाचा

'या' भाज्या कधीच कच्च्या खाऊ नका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा