Advertisement

पुश-अप्स मारताना करू नका या ९ चुका

अनेकदा अनेक जण घरच्या घरी व्यायाम करतात. असाच एक व्यायाम प्रकार म्हणजे पुश-अप. पुश-अप्स करताना आपण अनेक चुका करत असतो. पण याच चुका तुमच्या अंगलट येऊ शकतात. म्हणून पुशअप्स करताना काय काळजी घ्यायची यासाठी काही टिप्स...

पुश-अप्स मारताना करू नका या ९ चुका
SHARES

बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्यापैकी अनेक जण व्यायाम आणि आहार यावर अधिक भर देतात. दिवसभराच्या धावपळीतून थोडा वेळ काढत व्यायाम केल्यानं शरीर आणि मन दोन्ही तंदुरूस्त होतात, हे आता सर्वांनाच कळलंय. पण आपण व्यायाम करतो हे इतकंच पुरेसं नसतं. आपण तो योग्य करतोय की नाही हे देखील फार महत्त्वाचं आहे.

अनेकदा अनेक जण घरच्या घरी व्यायाम करतात. असाच एक व्यायाम प्रकार म्हणजे पुश-अप्स. पुश-अप्स करताना आपण अनेक चुका करत असतो. घरच्या घरी पुश-अप्स करण्यात काही समस्या नाही. पण तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आणि कोणाच्या देखरेखीत व्यायाम करत नसाल तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं. म्हणून पुश-अप्स मारताना आम्ही सांगितल्यानुसार काळजी घेतली तर काही त्रास होणार नाही.

1) जेव्हा तुम्ही पुश-अप्स मारता तेव्हा हात योग्य स्थितीत आहे की नाही याची खात्री करा. तळहात खूप पुढे किंवा रुंद असणे हे चुकीचं आहे. यामुळे खांद्यावर ताण पडतो. म्हणून आपले तळहात हे खांद्याच्या खाली आणि छातीच्या बाजूला थोडे रुंद असावेत. असं केलंत तर पुश-अप्स मारताना शरीराला योग्य आधार मिळेल.

2) पुश-अप्स मारताना कोपर बाहेरच्या बाजूला असावेत.

3) पुश-अप्स मारताना आपण घाईत कंबरेखालचा भाग अधिक वर नेतो. त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते.  पाठीचा कणा आणि कंबर याचं योग्य संतुलन असणं फार गरजेचं आहे.

4) पुश-अप्स करताना मानेच्या हालचालीवर पण नियंत्रण हवं. अनेकदा मान आधीच वर होते किंवा खाली होते. पण पुश-अप्स मारताना पाठ आणि मान दोन्ही ताठ असणं आवश्यक आहे. त्यामुळे पुश-अप्स मारताना मान स्थिर असावी.

5) पुश-अप्स करताना श्वासोश्वास चालू ठेवणं गरजेचं आहे. अनेकदा पुश-अप्स मारताना श्वासोश्वास रोखून ठेवतो किंवा संतूलन साधण्यासाठी श्वास घेणं विसरतो. पण यामुळे आपण लवकर थकतो. त्यामुळे पुश-अप्स मारताना श्वास आत घ्या आणि पुश-डाऊन करताना श्वास सोडा. यामुळे तुमचा रक्त प्रवाह सुरळीत राहील.

6) पुश-अप्स जोरात करू नये. अनेकदा जोरात पुश-अप्स केल्यास आपण अधिक करू असा समज असतो. पण अशामुळे अंतर्गत इजा होण्याची शक्यता असते.

7) पुश-डाऊन करताना छाती जमिनीला टेकली पाहिजे. पण अनेकदा असं न होता पुश-डाऊन करताना मान किंवा नाक पहिली जमिनीला टेकली जाते. जर असे होत असेल तर समजून जा की आपण कुठेतरी चुकत आहेत.

8) पुश-अप्स मारताना छाती, पोटातील स्नायू, पाठीचा मणका, कंबरेचा भाग शरीराच्या या सर्व भागांवर ताण पडतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही पुश-अप्स करताना तुमच्या शरीराच्या या भागांवर ताण पडतो की नाही हे पडताळून पाहा.

9) पुश-अप्स किती करतो या संख्येवर जास्त भर देऊ नका. तुम्ही पुश-अप्स कमी पण योग्य पद्धतीनं करा.



हेही वाचा

'हे' ७ व्यायाम प्रकार तुमचं आयुष्य करतील सुखकर

पोटाचा घेर कमी करण्यासाठी 'हे' पदार्थ फायदेशीर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा