मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०२२-२३

Updated: Thu, 03 Feb 2022 07:11:37 GMT

मुंबई महापालिकेचा २०२२ - २३ वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. यंदा मुंबई महापालिकेचा २०२२-२३ वर्षाचा अर्थसंकल्प किती कोटींचा असून, यामधून मुंबईकरांना काय मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Live Updates

मिठी नदीच्या पुनरुज्जीवनकरणासाठी ५६५.३६ कोटी इतकी तरतूद
  • आजमितीस मिठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे काम ९५ टक्के आणि संरक्षक भिंत बांधण्याचे ८० टक्के काम पूर्ण झाल्यामुळे मिठी नदीची धारण क्षमता दुपटीने आणि वहन क्षमता तीन पटीने वाढली
  • मिठी नदीच्या विकासाचा आणि नदीतील प्रदूषण नियंत्रणाचा आराखडा तयार करण्यात आलेला असून त्याची अंमलबजावणी चार पॅकेजमध्ये प्रस्ताविण्यात आली आहे.
  • पॅकेज- १ अंतर्गत मिठी नदीच्या फिल्टर पाडा ते डब्लू.एस. पी. कंपाऊंड, पवई येथे इंटरसेप्टर चे बांधकाम करणे, मलनि:सारण वाहिनी टाकणे, सर्व्हिस रोडचे बांधकाम करणे आणि ८ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम करणे या कामांचा खर्च ₹१३३ कोटी अपेक्षित असून सदर खर्चामध्ये १५ वर्षे प्रचालन व परिरक्षणाच्या खर्चाचा समावेश आहे. सदर काम प्रगतीपथावर,
  • पॅकेज-२ अंतर्गत डब्लू.एस.पी. कंपाऊंड पवई ते सीएसटी रस्ता, कुर्ला येथे संरक्षक भिंत, सेवा रस्ता, इंटरसेप्टर आणि मलनिःसारण वाहिनी टाकणे यासाठी ₹५७० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. सदर कामे प्रगतीपथावर ,
  • पॅकेज-३ अंतर्गत सी.एस.टी रोड, कुर्ला ते माहिम कॉजवे दरम्यान संरक्षण भिंत व सेवा रस्त्याचे बांधकाम करणे, मलनिःसारण वाहिनी टाकणे, इंटरसेप्टर गेटपप्स (‘फ्लड गेटस’ पंपिंग यंत्रणेसह) बांधणे, सुशोभिकरणासह प्रॉमेनेडस्चे बांधकाम आणि इतर कामे यासाठी एकूण ₹२१५६ कोटी एवढा खर्च अपेक्षित असून सदर खर्चामध्ये १० वर्षाच्या प्रचालन व परीरक्षणाच्या खर्चाचा समावेश आहे. सदर कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर
  • पॅकेज-४ मध्ये बापट नाला ते सफेद पूल नाला ते धारावी मलजल प्रक्रिया केंद्र, येथील बोगद्याच्या बांधकामासाठी ₹४५५ कोटी खर्च अपेक्षित आहे. सदर काम प्रगतीपथावर आहे. सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ₹५६५.३६ कोटी इतकी तरतूद
3 Feb - 12:26 PM
२०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात ₹२६६०.५६ कोटींची तरतूद

आरोग्य खात्यासाठी २०२१ २२ च्या सुधारीत अर्थसंकल्पात ₹११०२.३८ कोटी आणि सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात ₹२६६०.५६ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

कोविड-१९ च्या महामारीमध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेने या संकटावर मात करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. दिनांक ३०.०९.२०२१ पर्यंतच्या झालेल्या खर्चापैकी ₹१४१७.३२ कोटी आणि ₹१३४७.५६ कोटी इतक्या खर्चाची अनुक्रमे जिल्हाधिकारी, मुंबई शहर जिल्हा आणि जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (SDRF) प्रतिपूर्तीची मागणी करण्यात आली आहे

3 Feb - 12:02 PM
मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प कोस्टल रोड

मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या सर्वात प्रतिष्ठित प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे बहुसंख्य नागरिकांच्या वेळेसह इंधनाचीही बचत होण्यास मदत होईल.

 

मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प बांधकामाचा मूळ खर्च ₹८४२९.४४ कोटी आहे

आणि कर, पर्यवेक्षण आकार, सल्लागारांचे शुल्क आणि इतर आकारासह एकूण खर्च ₹१२९५० कोटी इतका आहे.

पॅकेज I, II व IV च्या सर्व कामांची सुरुवात झाली आहे आणि आजपर्यंत ५०% प्रगती

पॅकेज IV मध्ये, प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटीपर्यंतच्या २०७२ मीटरच्या पहिल्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले

3 Feb - 11:59 AM
राज्य शासनाकडून पालिकेला थकबाकी ₹६७६८.१६ कोटी येणे बाकी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर इत्यादीपोटी दि. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ₹६७६८.१६ कोटी इतके येणे आहे

ज्यामध्ये राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडून सहाय्यक अनुदानापोटी ₹४८४०.६१ कोटी येणे असलेल्या रकमेचा अंतर्भाव आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेस देय असलेल्या रकमांच्या वसुलीबाबत / समायोजनेबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित खात्यांकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत आहे.-

3 Feb - 11:58 AM