Advertisement

मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०२२-२३

SHARE

मुंबई महापालिकेचा २०२२ - २३ वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. यंदा मुंबई महापालिकेचा २०२२-२३ वर्षाचा अर्थसंकल्प किती कोटींचा असून, यामधून मुंबईकरांना काय मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

LIVE UPDATES

11:57 AM, Feb 03 IST
२०२१-२२ या आर्थिक वर्षाचे महसूली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज ₹२७८११.५७ कोटी वरुन ₹३७५३८.४१ कोटी असे सुधारीत करण्यात आले असून त्यामध्ये ₹९७२६.८४ कोटी इतकी वाढ झाली आहे.
11:56 AM, Feb 03 IST
दि. ३१.०१.२०२२ पर्यंत ₹३०८५१.१८ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे.
11:54 AM, Feb 03 IST
मुंबईकरांसाठी महापालिकेच्या सगळ्या सेवा आता Whatsapp वर उपलब्ध

महापालिकेच्या कार्यालयाला भेट न देता आता मुंबईकरांना महापालिकेच्या सेवा सुविधांची माहिती घरबसल्या Whatsapp वर मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेने Whatsapp Chatbotची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दुकानाच्या परवान्यासाठी अर्ज करणं, करपरतावा अशा विविध सुविधा आता नागरिकांना Whatsapp वर उपलब्ध होतील.

11:54 AM, Feb 03 IST
‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग’ सोबतच ‘इज ऑफ लिव्हिंग’वर भर

या वर्षापासून नागरिकांसाठी ‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग’ सोबतच ‘इज ऑफ लिव्हिंग’वर भर देणार आहे. या अंतर्गत रस्ते विभाग आणि पूल विभाग सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि नवीन पुलांमुळे शहरातील प्रवास अधिक सुलक्ष होईल. स्त्रिया आणि लहान मुलांसह नागरिकांना सुरक्षितता देण्यासाठी अधिक संख्येने आवश्यक असलेल्या ठिकाणी पथदिवे बसवून रस्त्यांवरील सुरक्षिततेची सुलभता सुधारली जाईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्बन स्पेस डिझायनर्सच्या पॅनेलमेंटची प्रक्रिया सुरू केली आहे ज्याद्वारे चालताना सुलभता वाढवण्यासाठी रस्ते, फूटपाथ आणि सामुदायिक जागांवर अभ्यास करून सजावट व नूतनीकरण करण्यात येईल.

11:53 AM, Feb 03 IST
मालमत्ता करापासून प्राप्त होणाऱ्या उत्पनाची स्थिती

२०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी मिळणारे अंदाजित उत्पन्न हे ७००० कोटी रुपयांवरुन ४८०० कोटी इतके सुधारीत करण्यात आले आहे. यामध्ये २,२०० कोटींची तूट नोंदवण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या भांडवली खर्चासाठी सन २०२१-२२ च्या सुधारित अंदाजामध्ये ७३.६७ कोटी रुपये आणि सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ७८.७६ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

11:53 AM, Feb 03 IST
​२०२२-२३ चे अर्थसंकल्पीय अंदाज ४५ हजार ९४९ कोटी रुपये

२०२१-२२ या आर्थिक वर्षाचे महसूली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज २७८११.५७ कोटी रुपयांवरुन ३७५३८.४१ कोटी असे सुधारीत करण्यात आले असून त्यामध्ये ९७२६.८४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ३०८५१.१८ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता अंदाजित महसूली उत्पन्न ३०७४३.६१ कोटी रुपये एवढे प्रस्ताविले असून ते सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत २९३२.०४ कोटी रुपयांनी जास्त आहे.

11:29 AM, Feb 03 IST
मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमासाठी ८०० कोटींची तरतुद
11:28 AM, Feb 03 IST
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात १७.७० कोटींची वाढ
11:27 AM, Feb 03 IST
मुंबई महापालिकेचा ४५ हजार ९४९ कोटींचा अर्थसंकल्प सादर
11:24 AM, Feb 03 IST
महापालिका अर्थसंकल्प २०२२-२३ सादर होण्यास सुरूवात
11:18 AM, Feb 03 IST
महापलिकेने 900 बालवाड्या चालवण्यास मान्यता दिली असून त्यापैकी 815 बालवाड्या कार्यरत आहेत.
11:17 AM, Feb 03 IST
शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून 5 वर्षांच्या देखभालीसह VTC प्रकल्पाच्या अपग्रेडेशनसाठी निविदा प्रक्रिया
Advertisement
11:16 AM, Feb 03 IST
प्रवेश अर्जासाठी ऑनलाइन लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाईल
11:14 AM, Feb 03 IST
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात नर्सरी ते ६ वी पर्यंतच्या सीबीएसई बोर्ड अभ्यासक्रमाच्या १० शाळा सुरू
11:13 AM, Feb 03 IST
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रदान केलेल्या शैक्षणिक सुविधा:
11:10 AM, Feb 03 IST
२०२१-२२ मध्ये २४ माध्यमिक शाळा सुरू
10:57 AM, Feb 03 IST
2022-23 पासून IGCSE आणि IB ची प्रत्येकी एक शाळा सुरू केली जाईल
10:56 AM, Feb 03 IST
शाळेची वेबसाइट सुरू करण्यात आली आहे.

BMC धोरणानुसार, शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 4 जानेवारी 2022 ते 4 फेब्रुवारी 2022 या कालावधीत सर्व नर्सरी वर्ग आणि K.G ते इयत्ता 8 वी च्या 11 CBSE आणि ICSE शाळांच्या रिक्त जागांसाठी सुरू करण्यात आली आहे.

Advertisement
10:51 AM, Feb 03 IST
व्हर्च्युअल ट्रेनिंगसाठी ३८ कोटी तुरतुद
10:43 AM, Feb 03 IST
शाळांच्या देखभाल स्वच्छतेसाठी ७५ लाखांची तरतुद
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा