
मुंबई महापालिकेचा २०२२ - २३ वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. यंदा मुंबई महापालिकेचा २०२२-२३ वर्षाचा अर्थसंकल्प किती कोटींचा असून, यामधून मुंबईकरांना काय मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
विकास नियोजन खात्याच्या उत्पन्नवाढीमुळे गुंतवणूकीत वाढ झाल्याने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे गुंतवणूकीवरील व्याजाकरीताचे अर्थसंकल्पीय अंदाज ₹९७५.५६ कोटी वरुन ₹१२०५.२६ कोटी असे सुधारीत करण्यात आले आहे. २०२२ २३ या आर्थिक वर्षामध्ये गुंतवणूकीवरील व्याजाच्या उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज ₹११२८.७४ कोटी इतके प्रस्ताविले आहेत.
सन २०२१ २२ मध्ये जकातीपोटी नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून ₹१०५८३.०८ कोटी इतके अनुदान अंदाजिले होते. त्यापैकी जानेवारी २०२२ पर्यंत ₹८८०७ कोटी इतके अनुदान प्राप्त झाले आहे. सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये नुकसान भरपाईपोटी ₹११४२९.७३ कोटी इतके उत्पन्न अंदाजिले आहे.
आरोग्य खात्यासाठी २०२१ २२ च्या सुधारीत अर्थसंकल्पात ₹११०२.३८ कोटी आणि सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात ₹२६६०.५६ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
कोविड-१९ च्या महामारीमध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेने या संकटावर मात करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. दिनांक ३०.०९.२०२१ पर्यंतच्या झालेल्या खर्चापैकी ₹१४१७.३२ कोटी आणि ₹१३४७.५६ कोटी इतक्या खर्चाची अनुक्रमे जिल्हाधिकारी, मुंबई शहर जिल्हा आणि जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (SDRF) प्रतिपूर्तीची मागणी करण्यात आली आहे
रस्ते व वाहतूक खात्याने, विभाग कार्यालये आणि वाहतूक पोलिस यांच्या सहयोगाने सुरक्षित शाळा संकल्पना प्रायोगिक तत्वावर तयार केली. शाळाक्षेत्रात वाहनांची कमीत कमी ये-जा असेल आणि वर्दळमुक्त पदपथावरुन शाळेत प्रवेश करता येईल. अशाप्रकारे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सुरक्षित वातावरण देणे हा या मागचा उद्देश होता. सन २०२१-२२ च्या सुधारित अंदाजामध्ये रु १९०० कोटी आणि २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये २२०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.
मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या सर्वात प्रतिष्ठित प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे बहुसंख्य नागरिकांच्या वेळेसह इंधनाचीही बचत होण्यास मदत होईल.
मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प बांधकामाचा मूळ खर्च ₹८४२९.४४ कोटी आहे
आणि कर, पर्यवेक्षण आकार, सल्लागारांचे शुल्क आणि इतर आकारासह एकूण खर्च ₹१२९५० कोटी इतका आहे.
पॅकेज I, II व IV च्या सर्व कामांची सुरुवात झाली आहे आणि आजपर्यंत ५०% प्रगती
पॅकेज IV मध्ये, प्रियदर्शनी पार्क ते गिरगांव चौपाटीपर्यंतच्या २०७२ मीटरच्या पहिल्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले
ज्यामध्ये राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडून सहाय्यक अनुदानापोटी ₹४८४०.६१ कोटी येणे असलेल्या रकमेचा अंतर्भाव आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेस देय असलेल्या रकमांच्या वसुलीबाबत / समायोजनेबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित खात्यांकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत आहे.-
