Ganesh Visarjan 2023 LIVE

Updated: Thu, 28 Sep 2023 12:43:19 GMT

अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल.

Live Updates

दादर वाहतूक विभागानुसार हे मार्ग बंद
  • स्वातंत्रवीर सावरकर मार्ग : दक्षिण वाहिनीवरील वाहतुक ही यस बँक सिग्नल येथून श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शन पर्यंत वाहतुकीस बंद.
  • स्वातंत्रवीर सावरकर मार्ग: उत्तर वाहिनी श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शन येथून यस बँक जंक्शन पर्यंत फक्त गणपती विसर्जन मिरवणुकांकरीता शिवाजीपार्क चौपाटी येथे जाणेकरीता राखीव.
  • रानडे रोड : रानडे रोड हा पानेरी जंक्शन येथून चैत्यभुमी जंक्शन ( स्वांतत्रवीर सावरकर मार्ग) पर्यंत वाहतुकीकरीता बंद राहील.
  • संत ज्ञानेश्वर मंदिर रोड : चैत्यभुमी जंक्शन ( स्वांतत्रवीर सावरकर मार्ग) ते चैत्यभुमी गणेश विसर्जन चौपाटी पर्यंत वाहतुकीस बंद राहिल.
  • जांभेकर महाराज मार्ग : सुर्यवंशी हॉल चौपाटी, द. स. बाबरेकर रोड यांना जोडणारा पर्यंत आवश्यकते नुसार वाहतुकीस बंद राहिल.
  • केळूस्कर रोड दक्षिण मार्ग : संपूर्ण रस्ता वाहतुकीकरीता बंद राहील
  • केळूस्कर रोड उत्तर मार्ग : संपूर्ण रस्ता वाहतुकीकरीता बंद राहील
  • एम. बी. राऊत रोड : संपूर्ण रस्ता वाहतुकीकरीता बंद राहील.
  • टिळक उड्डाणपूल : कोतवाल गार्डन सर्कल येथून दादर टी टी सर्कल पर्यंत वाहतुकीकरीता बंद राहिल.
  • बाळ गोविंददास रोड : जे. के. सावंत मार्ग ते एल. जे. रोड पर्यंत एक दिशा मार्ग राहिल.
  • एस. के. बोले रोड : एस. के. बोले रोड हा श्री. सिध्दीविनायक मंदिर जंक्शन ते पोर्तुगिज चर्च जंक्शन पर्यंत आवश्यकते नुसार एक दिशा मार्ग राहिल.
28 Sep - 10:48 AM
काळबादेवी वाहतूक विभागानुसार हे मार्ग बंद
  • जे. एस. एस. रोड : संगीतकार अब्दुल करीम खान चौक (अल्फ्रेड जंक्शन) ते समतानंद अनंत हरी गद्रे चौक (पोर्तुगीज चर्च) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील.
  • विठ्ठलभाई पटेल मार्ग : कस्तुरबा गांधी चौक ( सी पी टैंक सर्कल) ते भगवान श्री चंद्रप्रभा चौक (हॉटेल नित्यानंद जंक्शन).
  • बाबा साहेब जयकर मार्ग : डॉ. चंद्रकला हाटेबाई चौक (घोडागाडी जंक्शन) ते डॉ. यशवंत सामंत चौक ( खत्तर गल्ली नाका).
  • राजा राम मोहन रॉय रोड : चारुशीला गुप्ते चौक (चर्नी रोड स्टेशन जंक्शन) ते पदमश्री गोवर्धन बाप्पा चौक (प्रार्थना समाज जंक्शन) हा रस्ता गरजेनुसार वाहतुकीस बंद राहील.
  • कावसजी पटेल टैंक रोड : तीन बत्ती नाका (गुलालवाडी सर्कल) ते कस्तुरबा गांधी चौक (सी पी टँक सर्कल) दरम्यानची वाहतूक बंद.
  • संत सेना मार्ग (दुसरा कुंभारवाडा रोड ) : एम एस अली रोड येथील जंक्शन ते संत श्री पुनित महाराज चौक ( नानुभाई देसाई रोड येथील जंक्शन).
  • नानुभाई देसाई रोड : गोकुळधाम जंक्शन ते लक्ष्मीनारायण मंदीर चौक (माधवबाग).
  •  सरदार वल्लभभाई पटेल रोड : गोल देऊळ ते पदमश्री गोवर्धन बाप्पा चीक (प्रार्थना समाज जंक्शन).

पर्यायी मार्ग

  • गणेश विसर्जनाच्या दिवशी गिरगाव, ठाकूर व्दार, व्हीपी रोड, जे एस एस रोड, एस व्ही पी रोड, राजाराम मोहन रॉय रोड आणि त्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

28 Sep - 10:46 AM