Advertisement

Mumbai Rain : 'या' भागासाठी हवामान खात्याचा अलर्ट

पुढील 24 तास महत्वाचे

Mumbai Rain : 'या' भागासाठी हवामान खात्याचा अलर्ट
SHARES

मुंबईत गणेश विसर्जनाची धुम पहायला मिळत आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजा तसेच मुंबईचा महाराजा यासह मुंबईतील अनेक मोठे गणपती विसर्जनासाठी निघाले आहेत. भक्तांना पावसात भिजतच गणेश विसर्जन करावे लागणार आहे. पावासाबाबत हवामान खात्याने अत्यंत महत्वाचा अलर्ट दिला आहे. अनेक भागात जोरदार पाऊस पडणार आहे.  

हवामान विभागाने पावासाचा अंदाज वर्तवला आहे.  पुढील 24 तास महत्वाचे असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.  मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, कर्नाटक गोवा आणि केरळ किनारपट्टीवर काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

पुढील 24 तासांत राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये दडी मारून बसलेल्या पावसानं सप्टेंबरमध्ये चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय.

गेल्या काही दिवसांत कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसानं दमदार हजेरी लावलीय. त्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागानं जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय.


हेही वाचा

मुंबईत जून 2024 पर्यंत पाणीकपात होणार नाही

मुंबईत विसर्जनादरम्यान 'या' 13 धोकादायक पुलांवर निर्बंध

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा