लगे रहो मुन्नाभाई चित्रपटामध्ये अभिनेत्री विद्या बालनने निभावलेली रेडिओ जॉकीची भूमिका सर्वांच्या अजूनही लक्षात आहे. तशीच एक भूमिकेत ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेली तेजश्री प्रधान प्रेक्षकांना दिसणार आहे. आगामी 'असेही एकदा व्हावे' या मराठी चित्रपटामध्ये तेजश्री आरजेची भूमिका साकारत आहे.
चित्रपटाच्या आधी तेजश्रीने आपल्या भूमिकेसाठी कसून तयारी केली होती. त्यासाठी तिने आरजेचं खास एक महिना वर्कशॉपही केलं होतं. रेडिओ जॉकींचं बोलणं, श्रोत्यांसोबतचा त्यांचा संवाद, लकबी, शब्दांचे उच्चार, त्यांचा हजरजबाबीपणा, तसेच विषय खेळवत ठेवण्याची किमया आणि गाण्यांद्वारे केले जाणारे श्रोत्यांचे मनोरंजन या सर्व गोष्टी तेजश्री या वर्कशॉपमध्ये शिकली. त्यासाठी तिने रेडिओ स्टेशनला भेट देखील दिली. तिथे काम करत असलेल्या आरजेच्या कामाचे जवळून निरीक्षण करत आणि संवाद साधत तिने आपल्या व्यक्तिरेखेचे तयारी केली.
माझा नेहमी भूमिका परफेक्ट करण्यावर कल असतो. माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा माझ्याकडून पूर्ण व्हाव्यात यासाठी मी कितीही मेहनत घ्यायला तयार असते. म्हणूनच आरजेची भूमिका साकारण्यापूर्वी मी त्याचा सखोल अभ्यास केला.
तेजश्री प्रधान, अभिनेत्री
या सिनेमााच्या निमित्ताने प्रथमच उमेश कामत आणि तेजश्री प्रधान ही जोडगोळी मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहेत. येत्या ६ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा