Exclusive Video: 'बघा' ‘सविता दामोदर परांजपे’ सिनेमाचा 'थरारक' प्रवास !

सध्या चर्चेत असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी सिनेमाच्या टीमने प्रमोशनचं औचित्य साधत 'मुंबई लाइव्ह'च्या कार्यालयाला भेट दिली. यात दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी, अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तृप्ती तोरडमल यांचा समावेश होता. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या फेसबुक लाइव्हमध्ये तिघांनीही खेळीमेळीने संवाद साधत प्रश्नांची उत्तरं दिली.

इथं बघा, पूर्ण मुलाखत

दिलखुलास उत्तरं

‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकावर हा सिनेमा आधारित असल्याने त्या अनुषंगाने बरेच प्रश्न विचारण्यात आले. नाटकावरून सिनेमा बनवण्याच्या आव्हानापासून एकूणच ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा बनवण्याचा प्रवास स्वप्ना यांनी आपल्या बोलण्यातून उलगडला. ‘कट्यार काळजात घुसली’नंतर पुन्हा एकदा नाटकावर आधारीत सिनेमात काम करण्याच्या अनुभवासोबतच सुबोधने या नाटकातील थरार कशा प्रकारे प्रेक्षकांना खिळवून ठेवेल याबाबत सांगितलं. यासोबतच सुबोधने काही वैयक्तीक प्रश्नांचीही दिलखुलासपणे उत्तरं दिली.

सुबोधने गायलं गाणं

दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या असलेल्या तृप्तीने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनीही या सिनेमाची रफ कापी पाहिल्याचं रहस्य उलगडलं. जान अब्राहमसोबतची मैत्री आणि त्यामुळे त्याचं मराठीत झालेलं आगमन, पदार्पणातील सिनेमात अभिनय करताना टीमकडून झालेलं कौतुक आणि इतर बऱ्याच गोष्टी तृप्तीने शेअर केल्या. यासोबतच ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमातील एक संवाद तृप्तीने सविताच्या आवाजात बोलूनही दाखवला. ‘येशील रे वेल्हाळा…’ हे या सिनेमातील काहीसं रहस्यमय गाणं गात सुबोधने या लाइव्हचा शेवट गोड केला.


हेही वाचा-

अशी झाली मधुकर तोरडमल यांची इच्छा'तृप्ती'!

सुबोध-श्रुतीच्या ‘शुभ लग्न सावधान’चं पोस्टर लाँच


पुढील बातमी
इतर बातम्या