Advertisement

सुबोध-श्रुतीच्या ‘शुभ लग्न सावधान’चं पोस्टर लाँच

सुबोध भावे आणि श्रुती मराठे ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बंध नायलॅानचे’ या सिनेमानंतर ही जोडी ‘शुभ लग्न सावधान’ का म्हणत आहे? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यात या सिनेमाच्या पोस्टर लाँचने अधिक भर घातली आहे.

सुबोध-श्रुतीच्या ‘शुभ लग्न सावधान’चं पोस्टर लाँच
SHARES

‘शुभ लग्न सावधन’ या मराठी सिनेमाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि श्रुती मराठे ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बंध नायलॅानचे’ या सिनेमानंतर ही जोडी ‘शुभ लग्न सावधान’ का म्हणत आहे? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यात या सिनेमाच्या पोस्टर लाँचने अधिक भर घातली आहे.


लग्न समारोहवर आधारित

सुबोध-श्रुतीची मुख्य भूमिका असलेल्या ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमाचा पोस्टर लाँच सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून करण्यात आला. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा लग्न समारोहवर आधारित आहे.

समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध भावे आणि श्रुती मराठे या मराठीच्या प्रसिद्ध कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळते.


काय आहे पोस्टरमध्ये?

दुबईतील विहंगम दृश्यांची पार्श्वभूमी लाभलेल्या या पोस्टरमध्ये हातात हात घालून समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करणारे सुबोध आणि श्रुती पाहायला मिळतात.

पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात सुबोध-श्रुती यांच्या जोडीला डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. लगीनघाईवर आधारित असलेल्या या सिनेमात रसिकांना मराठमोळ्या विवाह सोहळ्याचा आनंद लुटता येणार आहे. १२ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा - 

सुबोध, श्रुतीची पुन्हा जमली जोडी!

सुबोध-श्रृतीच्या ‘शुभ लग्न'ची पत्रिका!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा