Advertisement

सुबोध, श्रुतीची पुन्हा जमली जोडी!

जवळजवळ अडीच वर्षांपूर्वी प्रथमच एकत्र आलेली सुबोध भावे आणि श्रुती मराठे ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकत्र आली आहे.

सुबोध, श्रुतीची पुन्हा जमली जोडी!
SHARES

आजतागायत बऱ्याच कलाकारांनी जोड्यांच्या रूपात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. जवळजवळ अडीच वर्षांपूर्वी प्रथमच एकत्र आलेली सुबोध भावे आणि श्रुती मराठे ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकत्र आली आहे.


अडीच वर्षांनी एकत्र

सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांना सर्वप्रथम एकत्र आणण्याचं श्रेय दिग्दर्शक जतीन वागळे यांना जातं. ‘बंध रेशमाचे’ या सिनेमात वागळे यांनी सुबोध-श्रुतीची जोडी जमवली. आता फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित 'शुभ लग्न सावधान' या सिनेमाद्वारे ही जोडी पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित असल्याचा अंदाज शीर्षकावरून येतो.दुबईत चित्रीकरण

या सिनेमाचं चित्रीकरण दुबईत चित्रीकरण करण्यात आलं आहे. कथानकाची गरज ओळखून ‘शुभ लग्न सावधान’चं चित्रीकरण दुबईत करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दुबईच्या पार्श्वभूमीवर सुबोध-श्रुती यांची प्रेमकहाणी यात पाहायला मिळणार आहे.


जुलैमध्ये प्रदर्शित

पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेला हा कौटुंबिक सिनेमा जुलै महिन्यात प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांना यात आशयघन मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे जवळजवळ अडीच वर्षांनी एकत्र आलेल्या सुबोध-श्रुतीच्या चाहत्यांसाठी 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा खूप खास ठरणार आहे, हे निश्चित!हेही वाचा-

चित्रपटाच्या परवानग्यांसाठी 'सिंगल विंडो'

कोण बनणार ‘भाई’?संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा