Advertisement

चित्रपटाच्या परवानग्यांसाठी 'सिंगल विंडो'

पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नुकताच एक शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच या निर्णयाची प्रत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना सुपूर्द केली. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि आशुतोष गोवारीकर यांनी महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी या 'सिंगल विंडो' योजनेचा कसा उपयोग होऊ शकतो, यावर चर्चा केली.

चित्रपटाच्या परवानग्यांसाठी 'सिंगल विंडो'
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात सातत्याने चित्रपट, टीव्ही मालिकांचं तसंच जाहिरातपट, माहितीपट यांचं चित्रीकरण होत असतं. त्यासाठी निर्मात्यांना विविध प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. यामध्ये खूप वेळ आणि श्रम खर्च होतो. त्यामुळेच राज्य सरकारने या परवानग्यांसाठी एक खिडकी (सिंगल विंडो) योजना सुरू केली आहे.

पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नुकताच एक शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच या निर्णयाची प्रत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना सुपूर्द केली. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि आशुतोष गोवारीकर यांनी महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी या 'सिंगल विंडो' योजनेचा कसा उपयोग होऊ शकतो, यावर चर्चा केली.

बॉलिवूड आणि टुरिझमची हातमिळवणी

शुटींगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटन वाढवण्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो. बॉलिवूडच्या इतरही कलाकारांनी या कामासाठी सकारात्मकता दाखवली आहे. बॉलिवूड टुरिझम हा नवीन प्रकार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता यामुळे वाढली आहे, असं पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले. 

चित्रपटाचं चित्रीकरण करताना अनेक ठिकाणी फिरावे लागतं. त्यासाठी भरमसाठ परवानग्या घ्याव्या लागतात. यामुळे खूप वेळ खर्च होतो. मात्र एक खिडकी योजनेमुळे विविध परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील. यामुळे वेळ वाचून चित्रीकरणासाठी त्याचा फायदा होईल.
- आशुतोष गोवारीकर, सिनेनिर्माता

काय आहे एक खिडकी योजना?

  • कुठलीही परवानगी या माध्यमातून १५ दिवसात मिळणार
  • महाराष्ट्र चित्रपट , रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी हि सनियंत्रण संस्था आहे
  • शासकीय जागांवरील स्थळासाठी परवानग्या मिळणार
  • प्रथम मुंबई शहर आणि उपनगरात हि एक खिडकी योजना लागू होणार.
  • काही काळाने संपूर्ण महाराष्ट्रात हि योजना सुरु करण्यात येईल.
  • निर्मात्यांनी परवानग्यांसाठी www.maharashtrafilmcell.com या वेबपोर्टलवर अर्ज करावे

हेही वाचा-

अमराठी संगीतकारांचा मराठी बाणा

कोण बनणार ‘भाई’?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा