Advertisement

सुबोध बायकोला घाबरतो?

‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमात पुन्हा एकदा सुबोध भावे आणि श्रुती मराठे एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी ‘बंध नायलाॅनचे’ या सिनेमासाठी ही जोडी सर्वप्रथम एकत्र आली होती. ‘शुभ लग्न सावधान’ या आगामी सिनेमातच सुबोध आपल्या बायकोला म्हणजेच श्रुतीला घाबरताना दिसणार आहे.

सुबोध बायकोला घाबरतो?
SHARES

अभिनय आणि दिग्दर्शनासोबतच आता लेखन आणि निर्मितीकडे वळत मराठी सिनेसृष्टीत चतुरस्र कामगिरी करणारा अभिनेता सुबोध भावे चक्क आपल्या बायकोला घाबरतो अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. होय, सुबोध बायकोला घाबरतो, पण ही बायको रिअल लाईफमधील नसून रील लाईफमधील आहे.


कुठला सिनेमा?

‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमात पुन्हा एकदा सुबोध भावे आणि श्रुती मराठे एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी ‘बंध नायलाॅनचे’ या सिनेमासाठी ही जोडी सर्वप्रथम एकत्र आली होती. ‘शुभ लग्न सावधान’ या आगामी सिनेमातच सुबोध आपल्या बायकोला म्हणजेच श्रुतीला घाबरताना दिसणार आहे.



टीझर लाँच

लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी अमूल्य गाठ. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटतं. त्यामुळेच कित्येकजण मंगलाष्टकामधील 'सावधान' या शब्दाचा सूचित अर्थ लावत लग्नापासून दूर पळतात. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' या सिनेमात अशाच एका तरुणाची गोष्ट मांडण्यात आली असून, नुकताच या सिनेमाचा मजेशीर टीझर सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आला.


काेण कलाकार?

श्रीराम आगाशे (कल्पनाकांत) यांच्या 'मी बायकोला घाबरतो' या धम्माल काव्यपंक्तीवर प्रमुख भूमिकेत असलेल्या सुबोधची उडालेली भंबेरी या टीझरमध्ये बघायला मिळते. 'शुभ लग्न सावधान' या सिनेमाच्या टीझरमध्ये श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये हे कलाकार दिसतात.


कुठे चित्रीकरण?

हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित जरी असला, तरी विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झालेली मजेशीर अवस्था या सिनेमात पाहायला मिळेल. या सिनेमाचे कार्यकारी निर्माते असलेल्या अभय शेवडे यांच्या संकल्पनेतून हा कौटुंबिक चित्रपट आकारास आला असून, याचं चित्रीकरण दुबई आणि इगतपुरी येथील नयनरम्य ठिकाणी झालं आहे.



हेही वाचा-

तुकाबाबाच्या भेटीची आस अन् पुष्पक विमानाचा ध्यास

सुबोध-श्रृतीच्या ‘शुभ लग्न'ची पत्रिका!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा