Advertisement

सुबोध-श्रृतीच्या ‘शुभ लग्न'ची पत्रिका!

सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाची लग्नपत्रिका अपलोड करण्यात आली आहे. या सिनेमात सुबोध भावे आणि श्रुती मराठे मुख्य भूमिकेत असल्यानं शुभेच्छुकांमध्ये सर्वात वर सुबोध-श्रृतीचं नाव आहे. त्यानंतर डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये यांचीही नावं या लग्नपत्रिकेत शुभेच्छुक म्हणून आहेत.

सुबोध-श्रृतीच्या ‘शुभ लग्न'ची पत्रिका!
SHARES

देश तसा वेष करावा लागतो ते खोटं नाही. सिनेमांच्या बाबतीतही असंच आहे. जसा विषय तसं प्रमोशन हा अलीकडच्या काळातील यशाचा फंडा बनला आहे. ‘शुभ लग्न सावधान’ या मराठी सिनेमाच्या टीमने प्रमोशनसाठी चक्क लग्नपत्रिका छापली आहे.


सोशल मीडियावर लग्नपत्रिका अपलोड

सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाची लग्नपत्रिका अपलोड करण्यात आली आहे. या सिनेमात सुबोध भावे आणि श्रृती मराठे मुख्य भूमिकेत असल्यानं शुभेच्छुकांमध्ये सर्वात वर सुबोध-श्रृतीचं नाव आहे. त्यानंतर डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये यांचीही नावं या लग्नपत्रिकेत शुभेच्छुक म्हणून आहेत.


सिनेमात कोणाचं लग्न?

ज्येष्ठ कलाकार किशोर प्रधान हे वधु-वरांना आशीर्वाद देत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये ही नवी जोडी प्रेक्षकांना सिनेमागृहात यायचं लाडिक आग्रहाचं आमंत्रण करत आहेत. यामुळे 'शुभ लग्न सावधान’ या सिनेमात नेमकं कोणाचं लग्न पाहयला मिळणार आहे? असा प्रश्न या सिनेमातील कलाकारांच्या चाहत्यांना पडणं साहाजिक आहे.


दिग्दर्शक कोण?

१२ ऑक्टोबर, २०१८ या शुभ मुहूर्तावर हे लग्न लागणार, म्हणजेच हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 'शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाची निर्मिती पल्लवी विनय जोशी यांनी केली असून, समीर सुर्वे यांनी संवाद लेखन आणि दिग्दर्शन अशी दुहेरी कामगिरी बजावली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा