'बंदुक्या' सिनेमाचे दिग्दर्शक राहुल चौधरी हे आता 'इबलिस' घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सहा नामांकनं आणि चार राज्य पुरस्कार 'बंदुक्या' चित्रपटाने पटकावले होते. सोशल मीडियावर नुकतेच 'इबलिस' सिनेमाचा लोगो लाँच करण्यात आला आहे.
सिनेमाचा लोगो हा सिनेमा नक्की काय आहे? हे सांगण्याची पहिली पायरी असते. सिनेमाची कन्सेप्ट, गोषवारा म्हणजेच एकंदरीत ओळख दाखवण्याचं काम सिनेमाचा लोगो करत असतो.
राहुल चौधरी, दिग्दर्शक
'इबलिस' सिनेमाचा लोगो उत्सुकता वाढवत आहे. 'धक्का लागी बुक्का' अशी दमदार पंचलाईन या सिनेमाची आहे. या लोगोमध्ये एक भला मोठा फळा दिसत आहे. या फळ्यावर 'धक्का लागी बुक्का' असा सुविचार लिहिला आहे! त्याचबरोबर या फळ्यावर वार, दिनांक, विषयही लिहिला आहे. एकंदरीत चित्रपटाचा लोगो बघता हा चित्रपट शाळा या विषयावर आधारीत असावा असं वाटतंय. 'लवकरच होणार लढाई' असं म्हणत हा चित्रपट २०१८ मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हीट ठरलेल्या 'बंदूक्या' या सिनेमात अभिनेता शशांक शेंडे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन राहुल चौधरी यांनी केलं होतं. या सिनेमाची गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या चित्रपटाची कथाही प्रेक्षकांना विशेष आवडली होती.
हेही वाचा