Advertisement

कान्समध्ये झळकणार 'हे' तीन मराठी चित्रपट

कान्स चित्रपट महोत्सवासाठी ३ मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून एकूण २६ मराठी चित्रपट परीक्षणासाठी पाठवण्यात आले होते. यातील 'इडक’, 'क्षितीज....अ होरीझॉन’ आणि 'पळशीची पी.टी.’ या तीन सिनेमांची निवड करण्यात आली आहे.

कान्समध्ये झळकणार 'हे' तीन मराठी चित्रपट
SHARES

यावर्षी कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ८ मे ते १८ मे या कालावधीत फ्रान्समध्ये पार पाडणार आहे. या चित्रपट महोत्सवासाठी ३ मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून एकूण २६ मराठी चित्रपट परीक्षणासाठी पाठवण्यात आले होते. यातील 'इडक’, 'क्षितीज....अ होरीझॉन’ आणि 'पळशीची पीटी’ या तीन सिनेमांची निवड करण्यात आली आहे.



चित्रपट परीक्षण समितीमध्ये रघुवीर कुलकर्णी(दिग्दर्शक, निर्माता), रेखा देशपांडे (चित्रपट समीक्षक), अरूणा जोगळेकर (पटकथाकार, दिग्दर्शक, निर्माता), प्रमोद पवार (लेखक, अभिनेते), पुरूषोत्तम लेले (निर्माता, दिग्दर्शक) या मंडळींचा समावेश होता.



केवळ 'कान्स' चित्रपट महोत्सवात नाही, तर 'इडक' या चित्रपटाची 'इफ्फी' चित्रपट महोत्सवातही निवड करण्यात आली आहे. दीपक गावडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. किशोर कदम, उषा नाईक, संदीप पाठक यांच्या 'इडक' मध्ये प्रमुख भूमिका आहेत. तर करिष्मा महाडोलकर निर्मित 'क्षितीज....अ होरीझॉन' या चित्रपटात उपेंद्र लिमये, मनोज जोशी हे प्रमुख भूमिकेत आहेत. पळशीची पीटी या चित्रपटाची निर्मिती फलटणमधील धोंडिबा कारंडे या तरूणाने अत्यंत कठीण परिस्थितीत केली आहे. स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञ हे फलटणच्याच आजूबाजूच्या परिसरातील आहेत. ग्रामीण भागात खेळाडूंना प्रोत्साहन मिळत नाही. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे खेळाडूंना नेहमीच हार पत्करावी लागते. अशी खेळाडूंची व्यथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.


हेही वाचा

ठरलं...मराठी बिग बॉसच्या घरात पहिला प्रवेश उषा नाडकर्णींचा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा