'ती अॅण्ड ती' चित्रपटाचं टीझर पोस्टर लाँच!

'जबरदस्त' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता पुष्कर जोग आपला नवा सिनेमा 'ती अॅण्ड ती'च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक धमाल चित्रपट घेऊन येत आहे. नुकतंच या चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. या पोस्टरमध्ये 'त्या' दोघींमध्ये अडकलेला पुष्कर आपल्याला दिसतोय.

शिवाय पुष्कर केवळ अभिनेता म्हणून नाही तर एक निर्माता म्हणूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना लंडनवारीचा अनुभव घेता येणार आहे.

एक निर्माता म्हणून 'ती अॅण्ड ती'च्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये दिसणारी श्रीमंती मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. यात प्रेमात गोंधळ उडालेल्या तरुणाची भूमिका साकारताना धमाल आली.

पुष्कर जोग, अभिनेता, निर्माता

‘ती’ असताना ‘ति’च्या येण्याने गांगरलेल्या तरूणाची ही कथा विराजस कुलकर्णी याने लिहिली आहे. तर मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात पुष्कर जोगबरोबर सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे प्रमुख भूमिकेत आहेत. या तिघांभोवती फिरणारी ही कथा लवकरच आपल्या सगळ्यांना कन्फ्युज करायला येणार आहे!


हेही वाचा

'शिकारी'चा पहिला ट्रेलर लाँच!

पुढील बातमी
इतर बातम्या