'अशी ही बनवाबनवी'ची ३१ वर्ष, आजही हे १० डायलॉग प्रेक्षकांना हसवतात

२३ सप्टेंबर १९८८ ला मराठी चित्रपटसृष्टीत एका सोनेरी पानाचा उगम झाला. याच दिवशी सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. याला आज ३१ वर्ष पूर्ण झाली. एवढी र्वष उलटली तरी या चित्रपटाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. चित्रपटाच्या कथेसोबतच चित्रपटातील डायलॉग्स देखील तुफान गाजले. आज देखील त्याचे डायलॉग्स आठवले की हसू आवरत नाही. ३१ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अशी ही बनवाबनवी चित्रपटातील डायलॉग्स तुमच्यासाठी खास सादर करत आहोत. वाचा आणि मनसोक्त हसा.

१) धनंजय माने इथेच राहतात का?

२) सरपोतदार : बरे झाले आठवण झाली, मी तुम्हाला औषधासाठी दिलेले सत्तर रुपये परत करा.

     माने: मी तुम्हाला म्हंटल होता ना, तो इस्राईल चा माझा मित्र, तो परवाच एका अपघातात वारला

     हो... तुम्ही दिलेले रुपये पण वारले.

     सरपोतदार : हा हालकटपणा आहे माने !

३) आमच्या शेजारी राहते, नवऱ्यानं टाकलंय तिला

४) सारखं सारखं एकाच झाडावर काय?

५) अजून बारका नाही मिळाला का ( शंतनू स्टूल आणतो तेव्हा)

६) आणि हा माझा बायको...

७) झुरळ... तशी आपल्या ऑफिसमध्ये झुरळं जरा कमीच आहेत.

८) विश्वास सरपोतदार :- तुम्हाला काही लाज लज्जा आहे का?

     धनंजय माने :-हो, जे काही आहे ते आम्ही बरोबरच नेऊ, तुम्हाला नाहीतरी त्याचा काय उपयोग?

९) मी सोलकर, सोलकर, सोलकर दर्याची राणी.

१०) जोडा खूप चांगला आहे, तोंडावर मारण्यासारखा


हेही वाचा

बंगाली दिग्दर्शक बनवतोय मराठी सिनेमा

सलमानच्या मराठी सिनेमासाठी रंगवली गावातील घरं

पुढील बातमी
इतर बातम्या