सलमानच्या मराठी सिनेमासाठी रंगवली गावातील घरं

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातही सलमानच्या नावची चर्चा सुरू आहे. आगामी मराठी सिनेमात मराठी रसिक चक्क सलमानच्या तालावर थिरकताना दिसणार आहेत.

  • सलमानच्या मराठी सिनेमासाठी रंगवली गावातील घरं

SHARE

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातही सलमानच्या नावची चर्चा सुरू आहे. आगामी मराठी सिनेमात मराठी रसिक चक्क सलमानच्या तालावर थिरकताना दिसणार आहेत.

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' चित्रपटातील बऱ्याच गोष्टी हळूहळू गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील अभिनेत्रींवरील पडदा उठला आणि आता या चित्रपटाचं टायटल साँग प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘सातारचा सलमान' असे बोल असलेल्या या धमाकेदार गाण्यात सुयोग गोऱ्हे, सायली संजीव, शिवानी सुर्वे, अक्षय टांकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे असे सगळेच कलाकार दिसत आहेत. प्रत्येकालाच ठेका धरायला लावणारं हे गाणं क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केलं असून, अमितराज यांनी संगीतबद्ध केलं आहे. आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजानं या गाण्याची रंगत अधिकच वाढवली आहे. नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी केलं आहे.

एकंदरच रंगीबेरंगी वातावरण, आजूबाजूला पारंपरिक पोशाखात जल्लोषात नाचणारे गावकरी, सुयोगचं उत्स्फूर्त नृत्य आणि त्याला इतर कलाकारांनी दिलेली उत्तम साथ एकंदरच सगळं मस्त जुळून आलं आहे. या गाण्याचा एक गंमतीशीर किस्सा हेमंतनं शेअर केला आहे. हे गाणं चित्रित करण्यापूर्वी हेमंतच्या डोक्यात काही कल्पना होत्या. मुळात हे गाणं खूपच उत्स्फूर्त, जल्लोषमय असल्यानं चित्रीकरणाचा परिसरही त्याला तसाच कलरफूल, उत्साहवर्धक हवा होता.

या चित्रपटाचं बरेच चित्रीकरण साताऱ्यातील गावांमध्ये चित्रित झाल्यानं तिथं रंगीबेरंगी घरं दिसण्याची तशी शक्यताच नव्हती. अखेर हेमंतनं गावाच्या चौकातल्या सगळ्या घरांना वेगवेगळे रंग देण्याचं ठरवलं आणि गंमत म्हणजे हेमंतच्या या निर्णयावर गावकऱ्यांनीही संमती दर्शवली. अगदी गावकरी येऊन येऊन सांगत होते, माझ्या घराला हिरवा रंग द्या, पिवळा रंग द्या. अखेर प्रत्येकानं आपापल्या आवडीनुसार घरांना रंग दिला आणि हेमंतला जे अपेक्षित होतं, ते गाण्यात उतरलं. आजही साताऱ्यातील केंजळ या गावात गेल्यावर ही रंगीबेरंगी घरं पाहायला मिळतात. हा सिनेमा ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

 LINK :  https://www.youtube.com/watch?v=n_peuFxaDsYहेही वाचा  -

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोकल प्रवास पाहिला का?

तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार हा कलाकार
संबंधित विषय
ताज्या बातम्या