महाराष्ट्रातील नेते उ. प्रदेशात करणार प्रचार

सोमवारी २९ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील मतदानाचा अंतिम टप्पा पार पडणार आहे. यानंतर महाराष्ट्रातील दिग्गज नेते प्रचारासाठी उत्तर प्रदेशात जाणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज पुरोहित अशा दिग्गजांचा समावेश आहे. हे नेते जौनपूर, मछलीशहर, आझमगढ, गोरखपूर, वाराणसी सारख्या ठिकाणी प्रचार करणार आहेत.

२९ एप्रिलाला अंतिम टप्पा

२९ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याची निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये मुंबईच्या सहा लोकसभेच्या जागांचाही समावेश आहे. महाराष्ट्रात से  उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल आदी राज्यांतून आलेल्या मतदारांची संख्याही अधिक आहे. त्यामुळेच या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरच सर्व भाषिक नेते उत्तर प्रदेशातील प्रचारासाठी जाणार आहेत.


हेही वाचा -

'असे' शोधा तुमच्या घराजवळील मतदान केंद्र


पुढील बातमी
इतर बातम्या