वेब सिरिजद्वारे मनसे मांडणार मुंबईतील खऱ्या समस्या

(File Image)
(File Image)

२०२२च्या पालिका निवडणुकीसाठी वरळीत जाण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (एनएसएस) 'पेंग्विन गेम्स' या नावाची वेब सिरीज सुरू केल्याची माहिती दिलीय. या वेब सिरीज अंतर्गत प्रभागातील ‘खऱ्या समस्या’ मांडण्यात येणार आहेत. पक्ष कार्यकर्त्यासाठी सोशल मीडियावर दर पंधरवड्यात एक नवीन भाग प्रसारित केला जाईल.

फेसबुकवर लाइव्ह झालेल्या पहिल्या भागात पक्षानं वरळीतील प्रेम नगरमधील पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या समस्यांचा आढावा दिला आहे. याशिवाय यात म्हटलं आहे की, स्थानिक आमदार आणि सत्ताधारी पक्षाला वरळीच्या समस्याचा विसर पडला आहे. लोक मूलभूत समस्यांना तोंड देत असताना केवळ कॉस्मेटिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत आहेत असे दिसते.

ही मालिका अशा वेळी रिलीज केली जात आहे जेव्हा शिवसेना आपल्या वरळी ए + मोहिमेला प्रोत्साहन देत आहे. जिथे स्ट्रीट आर्ट, एलईडी सिग्नल आणि पथ सुशोभिकरणावर जोर देण्यात येत आहे.

शौचालयाच्या निकृष्ट स्थितीबद्दल बोलणाऱ्या प्रेम नगरमधील रहिवाशांकडून या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोणत्याही सार्वजनिक शौचालयासाठी दरवाजे नाहीत. पाणीपुरवठा नाही आणि रहिवासी तक्रार देऊन कंटाळले आहेत, असं एका कार्यकर्त्यांनी सांगितलं.

नुकतीच, पालिकेनं वरळी सी फेस वर शहरातील पहिला LED पोल लावला. हा पोल वाहतूकीच्या सिग्नलसह रंग बदलतो. हिरवा, पिवळा आणि लाल रंग दाखवतो. गेल्या काही आठवड्यांपासून, आदित्य वरळीतील अनेक रस्त्यांची प्रतिष्ठापनांचं उद्घाटन करत आहे.

सेनेनं केलेल्या या घडामोडींबद्दल बोलताना मनसे म्हणाली, हे सर्व केवळ कॉस्मेटिक बदल आहेत जे उच्चभ्रू नागरिकांसाठी केले जात आहेत. वरळीची खरी समस्या गल्लीबोळांमध्ये आहे, जी या मालिकेत उघडकीस येईल.

२०१९ मध्ये शिवसेनेचे आदित्य ठाकरे वरळी इथून आमदार म्हणून निवडले गेले होते. तर प्रदेशातील सातही नगरसेवक हे शिवसेनेचेच आहेत. या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसचे कमी अस्तित्व आहे.


हेही वाचा

सुरक्षा कपातीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तर...

Bird Flu: अंडी-चिकन खाणाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला!

पुढील बातमी
इतर बातम्या