राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठीतून घेतली शपथ

राज्याचे १९ वे राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्यारी यांनी गुरूवारी राजभवनात शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. त्यावेळी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.

यांची उपस्थिती

राजभवनात झालेल्या या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पणन व वस्त्रोद्योग मंत्री प्रा. राम शिंदे, पदुम मंत्री महादेव जानकर, शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार, सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, उत्तराखंडचे वनमंत्री एच. एस. रावत, कृषी मंत्री सुबोध उनियाल, राज्यमंत्री रेखा आर्य, राज्यमंत्री डॉ. दान सिंह रावत आदी उपस्थित होते.

कोण आहेत कोश्यारी?

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला. त्यांनी उत्तरप्रदेशातील राजा इंटर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. परवत पियूष या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. त्यांनी उत्तरांचल प्रदेश क्यू? आणि उत्तरांचल संघर्ष एवंम समाधान या दोन पुस्तकांचे लेखन केले.

कोश्यारी हे ३० ऑक्टोबर २००१ ते १ मार्च २००२ या कालावधीत उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्यसभा, लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.


हेही वाचा -

पावसानं गाठला ३ हजार मिमी मोठा पल्ला


पुढील बातमी
इतर बातम्या