पावसानं गाठला ३ हजार मिमी पल्ला

मुंबईसह उपनगरात पडणाऱ्या मुसळधार पावसानं यंदा मोठा पल्ला पार केला आहे.

SHARE

मुंबईसह उपनगरात पडणाऱ्या मुसळधार पावसानं यंदा मोठा पल्ला पार केला आहे. मुंबईत जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसानं हजेरी लावली. तेव्हापासून गुरुवार ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पडलेल्या पावासनं ३ हजार मिलीमीटरचा मोठा पल्ला पार केला आहे. तसंच, मागील ५ दिवसात एकट्या सप्टेंबर महिन्याचा सरासरी पाऊस पडला आहे.  

एक महिना शिल्लक 

जून महिन्यापासून ५ सप्टेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रुझ वेधशाळेत तब्बल ३ हजार ७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसंच, कुलाबा वेधशाळेत २ हजार १६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाळा संपण्यास आणखी एक महिना शिल्लक असतानाच पावसानं मोठा पल्ला गाठाला

टप्पा गाठला

याआधी २०१० आणि २०१९ सालच्या मान्सून हंगामात पावसानं ३ हजार मिलीमीटर टप्पा गाठला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पावासानं दमदार हजेरी लावत ३ मिलीमीटरचा पल्ला पार केला आहेहेही वाचा -

एसटीच्या ताफ्यात आली पहिली इलेक्ट्रीक बससंबंधित विषय
ताज्या बातम्या