एसटीच्या ताफ्यात आली पहिली इलेक्ट्रीक बस

शिवाई ही बस वातानुकुलीत आहे. एकदा चार्ज केल्यावर ही बस ३०० किमीपर्यंतचा पल्ला सहज गाठते. या बसचा खर्च शिवशाही बसपेक्षा अधिक आणि शिवनेरीपेक्षा कमी असणार आहे.

SHARE

इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पहिल्या एसटी बसचं लोकार्पण गुरूवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. 'शिवाई' असं या बसचं नाव ठेवण्यात आलं असून ही बस दादर ते पुणे दरम्यान धावणार आहे. या पर्यावरणपूरक बसमुळे एसटी महामंडळा (MSRTC)च्या खर्चात बचत होणार आहे.  

३०० किमी धावणार

विजेवर चालणाऱ्या अशा एकूण १५० बस एसटी महामंडळ खरेदी करणार असून त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या बसची आसन क्षमता ४४ इतकी आहे. ही बस वातानुकुलीत आहे. एकदा चार्ज केल्यावर ही बस ३०० किमीपर्यंतचा पल्ला सहज गाठते. या बसचा खर्च शिवशाही बसपेक्षा अधिक आणि शिवनेरीपेक्षा कमी असणार आहे.

इंधन दरवाढीमुळे होणारा खर्च टाळण्यासाठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय घेतल्याचं एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. 

'शिवाई'ची वैशिष्ट्ये


  • सीसीटीव्ही
  • व्हिटीएस
  • ४४ आसन क्षमता
  • एका चार्जमध्ये ३०० किमी
  • चार्जिंगसाठी १ ते ५ तास
  • उद्घोषणा यंत्रणा

एसटी कार्यालयाचं उद्धाटन

सोबतच उद्धव ठाकरे यांनी मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाची बहुमजली इमारत आणि एसटी आगार, बसस्थानकाचा पुनर्विकास तसंच विद्याविहार येथील रा.प. कर्मचाऱ्यांसाठी सेवा निवासस्थान, विभागीय कार्यालय व विभागीय कार्यशाळा यांचा पुनर्विकास आणि शाळा संकुलाची निर्मिती या कामांचं भूमीपूजन देखील केलं.हेही वाचा-

बेस्ट कर्मचाऱ्यांना १२ हजारांपर्यंत पगारवाढ?

४ दिवसांत एसटी महामंडळाची १०० कोटींची कमाईसंबंधित विषय
ताज्या बातम्या