Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांना १२ हजारांपर्यंत पगारवाढ?

बेस्ट प्रशासनाने बेस्ट कामगार सेनेसोबत केलेल्या करारानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना ५ ते १२ हजार रुपये वाढ मिळणं अपेक्षित आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांना १२ हजारांपर्यंत पगारवाढ?
SHARES

वेतन करार आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा रोष कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलत बेस्ट प्रशासनाने गुरूवारी बेस्ट कामगार सेनेसोबत करार केला आहे. या करारानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना ५ ते १२ हजार रुपये वाढ मिळणं अपेक्षित आहे. परंतु ही तूटपुंजी असल्याचं सांगत बेस्ट कामगार कृती समितीने गणेशोत्सवानंतर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

उपोषण तात्पुरतं स्थगित

मागील महिनाभरापासून बेस्ट कृती समिती वेतन करारासहीत इतर मुद्द्यांवर बेस्ट प्रशासनासोबत वाटाघाटी करत आहेत. परंतु या वाटाघाटीला यश येत नसल्याने बेस्ट कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी वडाळा आगारासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं. परंतु सलग ३ दिवस उपोषणाला बसल्यानं कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती बिघडली. त्यामुळं त्यांना केईएम रुग्णालयात  दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर खासदार नारायण राणे यांच्या मध्यस्तीनंतर सणवारांच्या दिवसात सामान्य जनतेचे हाल होऊ नयेत, म्हणून हे उपोषण स्थगित करण्यात आलं. 

तुटपूंजी वाढ

त्यातच बुधवारी बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत वेतन करारासाठी ७८० कोटी रुपये देण्याची तयारी मुंबई पालिकेने दाखवली. पण परंतु यातून कर्मचाऱ्यांना केवळ ८ ते १० टक्केच पगारवाढ मिळत असल्याचं म्हणत कृती समितीने त्यास नकार दिला. त्यानंतर बेस्ट प्रशासनाने बेस्ट कामगार सेनेसोबत केलेल्या करारानुसार कामगारांना ५ ते १२ हजार रु. वाढ मिळू शकते. हा करार २०१६ ते २०२१ या कालावधीसाठी करण्यात आला आहे. परंतु हा करार केवळ कागदोपत्रीच असल्याचं सांगत कृती समितीने या कराराला विरोध दर्शवला आहे.हेही वाचा-

बेस्टच्या २०० बसगाड्या रखडल्या, कंत्राटदाराची माघार

मागण्यांबाबत चर्चा फिस्कटली, उपोषण कायम- शशांक रावRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा