पंकजा मुंडे अजूनही नाराज? भाजपच्या बैठकीला गैरहजर

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे अजूनही पक्षनेतृत्वावर नाराज असल्याचं पुढं आलं आहे. यामागचं कारण म्हणजे सोमवारी बोलवण्यात आलेल्या भाजपच्या विभागीय बैठकीला त्या गैरहजर होत्या. या बैठकीदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंडे गैरहजर असल्याची माहिती दिली.

भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला औरंगाबादमध्ये सोमवारी सकाळी सुरूवात झाली. या बैठकीला इतर सर्व स्थानिक नेते हजर असले, तरी पंकजा मुंडे बैठकीला येतील की नाही याविषयी चर्चा सुरू होती. परंतु या बैठकीला मुंडे अनुपस्थितीतच राहिल्या.    

हेही वाचा- पंकजा मुंडे ‘त्या’ फेसबुक पोस्टवर म्हणाल्या

यासंदर्भात माहिती देताना, पंकजा मुंडे यांच्याशी माझं बोलणं झालं तेव्हा त्यांनी आपली तब्येत ठिक नसल्याचं मला सांगितलं. त्यांनी माझी परवानगी घेतल्यावर मी त्यांना आरामाचा सल्ला दिला. शिवाय त्यांना १२ तारखेच्या कार्यक्रमाची तयारी करायची असल्याने तिथं त्यांची भेट होईलच, असं पाटील म्हणाले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीदरम्यान तिकीट कापण्यात आलेले आणखी एक नेते प्रकाश मेहता यांनीसुद्धा पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी कायम असल्याचीच चर्च राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या