पंकजा मुंडे ‘त्या’ फेसबुक पोस्टवर म्हणाल्या

नाराज भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाणार अशा चर्चांना उत आला होता. यावर खुलासा करताना मी भाजपची सच्ची कार्यकर्ती असून कुठल्याही दबावतंत्राही फेसबुक पोस्ट टाकली नाही, असं मुंडे म्हणाल्या.

SHARE

पुढील राजकीय वाटचाल काय? येत्या १२ डिसेंबरला सांगणार, अशी फेसबुक पोस्ट टाकल्यानंतर नाराज भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाणार अशा चर्चांना उत आला होता. यावर खुलासा करताना मी भाजपची सच्ची कार्यकर्ती असून कुठल्याही दबावतंत्राही फेसबुक पोस्ट टाकली नाही, असं मुंडे म्हणाल्या.

मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकताना असं म्हटलं होतं की, आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे…आठ ते दहा दिवसांनंतर...हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.

हेही वाचा- नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश


तसंच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरील भाजपचं नाव काढून टाकल्याने आश्चर्य व्यक्त व्हायला लागलं होतं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंडे पक्षातच असल्याचं स्पष्ट केलं. मंगळवारी सकाळी भाजप नेते विनोद तावडे यांनी मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. 

यानंतर उडालेल्या अफवांवर खुलासा करताना त्या म्हणाल्या की, १२ डिसेंबर रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिन असल्याने गोपीनाथ गडावर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने येण्याचं आवाहन मी या पोस्टद्वारे कार्यकर्त्यांना केलं होतं. माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी पक्षाची सच्ची कार्यकर्ती असून कुणावरही दबाव टाकण्यासाठी मी ही पोस्ट टाकलेली नाही.  


संबंधित विषय
ताज्या बातम्या