Advertisement

नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) आरे कारशेडचा विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा- मोदींच्या ड्रिम प्रोजेक्टला ब्रेक? बुलेट ट्रेनचा फेरआढावा घेणार

सौदी अरेबियाची अराम्को तसंच इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम इ. कंपन्यांच्या माध्यमातून रत्नागिरीतील राजापूर जिल्ह्यातील नाणार या गावात रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार होता. सुमारे ३ लाख कोटी रुपयांचा हा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प होता. परंतु या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाला ग्रामस्थांनी हरकत घेतली. त्यादरम्यान झालेल्या आंदोलनात तत्कालिक राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते.  

हेही वाचा- आरे कारशेडला स्थगिती, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

शिवसेनेने देखील या प्रकल्पाला विरोध केल्याने निवडणुकीआधी हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा भाजप सरकारने केली होती. २०१८ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन संघर्ष समितीला दिलं होतं. परंतु अद्याप हे गुन्हे मागे घेण्यात आले नव्हते. परंतु मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत २ महत्त्वाचे निर्णय घेत आंदोलकांना दिलासा दिला आहे.  

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा