मोदींच्या ड्रिम प्रोजेक्टला ब्रेक? बुलेट ट्रेनचा फेरआढावा घेणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रिम प्रोजेक्टला देखील दणका दिला आहे. एकूण ११ लाख कोटी रुपयांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे.

SHARE

मेट्रो ३ प्रकल्पातील आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रिम प्रोजेक्टला देखील दणका दिला आहे. एकूण ११ लाख कोटी रुपयांच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे.  

हेही वाचा- मेट्रो कारशेडसाठी राष्ट्रवादीने सुचवली 'ही' पर्यायी जागा

विधानसभेचं विशेष सत्र संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, 'सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्याचे आदेश मी दिले आहेत. या प्रकल्पांचा अंदाजे खर्च, त्यातील अडथळे आणि त्या प्रकल्पांची मुदत अशा सर्व बाजूंनी या प्रकल्पांचा आम्ही पुन्हा एकदा आढावा घेऊ. त्यानंतर यापैकी कोणता प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावायचा ते ठरवू. तसंच आतापर्यंत जे प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात आले ते घेण्याची खरंच गरज होती का, हे देखील तपासून पाहू. यामध्ये अर्थातच बुलेट ट्रेन प्रकल्पाचा देखील समावेश असेल. परंतु कुठलेही निर्णय सूडबुद्धीने घेण्यात येणार नाहीत.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनचा २५ टक्के खर्च राज्य सरकार उचलणार आहे. हा निधी प्रकल्पाला न देता या निधीतून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असा सूर महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्वच नेत्यांनी लावण्याची चर्चा आहे.

काय आहे बुलेट ट्रेन प्रकल्प?

  • बुलेट ट्रेन प्रकल्पाचा नियोजित खर्च ११ लाख कोटी
  • ८१ टक्के निधी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका)कडून मिळणार
  • निधी ०.१ टक्के व्याजावर ५० वर्षे मुदतीच्या कर्जाच्या माध्यमातून मिळणार
  • प्रकल्पासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनची स्थापना
  • कॉर्पोरेशनमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची प्रत्येकी ५ हजार कोटी, तर केंद्र सरकारची १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
  • प्रकल्पाची मुदत २०२३ पर्यंत
  • प्रकल्पासाठी आवश्यक १,३८० हेक्टर जमिनीपैकी ५४८ हेक्टर जमीन ताब्यात
  • पालघरमधील रहिवाशांचा बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध हेही वाचा-

आरे कारशेडला स्थगिती, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

४० हजार कोटी परत पाठवल्याचा आरोप खोटा - देवेंद्र फडणवीससंबंधित विषय
ताज्या बातम्या