Advertisement

मेट्रो कारशेडसाठी राष्ट्रवादीने सुचवली 'ही' पर्यायी जागा

राष्ट्रवादी काँग्रेसने मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा सुचवली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पर्यायी जागा सुचवल्याची माहिती दिली आहे.

मेट्रो कारशेडसाठी राष्ट्रवादीने सुचवली 'ही' पर्यायी जागा
SHARES

वादग्रस्त ठरलेल्या आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे मेट्रो कारशेड कुठे होणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा सुचवली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पर्यायी जागा सुचवल्याची माहिती दिली आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीत मेट्रो कारशेडसाठी आरेतील २६४६ झाडे तोडली होती. याला पर्यावरणप्रेमींनी मोठा विरोध केला होता. झाडे तोडण्याच्या निर्णयाचा निषेध करत मोठं आंदोलनही करण्यात आलं. आदित्य ठाकरे यांनीही आरेमध्ये कारशेड नको, अशी भूमिका घेतली. तर आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात दिलं होतं. 

 मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आरेमधील मेट्रो कारशेडच्या वादग्रस्त कामाला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीने मेट्रो कारशेडसाठी दुसरी पर्यायी जागा सुचवली आहे. गोरेगाव येथे १०२ हेक्टर जागेवर आरपीएफचे (राखीव पोलीस दल) मैदान आहे. या मैदानाचा अधिक वापर लग्नसोहळ्यांसाठी होतो. त्यामुळे ६० हेक्टर जागेवर तिथे मेट्रो कारशेड उभारता येईल असा पर्याय सुचवल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. हेही वाचा -

आरे कारशेडला स्थगिती, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
संबंधित विषय
Advertisement