Advertisement

फडणवीसांच्या काळातील ६ महिन्यांच्या फाईल मागवल्या

सर्व विभागांना विविध योजना, निविदा प्रक्रिया, लहान, मोठे निर्णय याबाबतच्या फाईल्स देण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

फडणवीसांच्या काळातील ६ महिन्यांच्या फाईल मागवल्या
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विका ंरल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. मेट्रोच्या आरे कारशेडला स्थगिती देऊन उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का दिला. तर आता फडणवीस सरकारच्या मागील ६ महिन्यांमधील सर्व निर्णयांच्या फाईल्स त्यांनी मागवल्या आहेत. या ६ महिन्यात फडणवीस सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय बारकाईने तपासला जाणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सर्व विभागांना विविध योजना, निविदा प्रक्रिया, लहान, मोठे निर्णय याबाबतच्या फाईल्स देण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे मागील ६ महिन्यात घेतलेले अनेक निर्णय बदलले जाण्याची शक्यता आहे.  कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी या आदेशाचा उद्देश आढावा घेण्याचा असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आढावा घेण्यास सुरुवात केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तर उद्धव ठाकरे यांनी याबाबत म्हटलं की,  जे प्रकल्प सुरु आहेत त्याचा आढावा घेतला जात असून कोणतंही सूडाचं काम आमचं सरकार करणार नाही.  लोकांच्या हिताचे सुरु असलेले प्रकल्प आणि त्यांची स्थिती काय आहे हे स्पष्ट होण्यासाठी हा सर्व आढावा घेतला जात असल्याचं उद्धव यांनी स्पष्ठ केलं आहे. 



हेही वाचा -

आता यू टर्न नकोच, बुलेट ट्रेनबाबत मनसे आमदाराची भूमिका

फडणवीस आता ‘या’ बंगल्यात राहणार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा