Advertisement

मुंडेसाहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल, उद्धव यांचा पंकजांना रिप्लाय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंच्या ट्विटला दिलेला रिप्लाय केंद्रस्थानी आला आहे.

मुंडेसाहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल, उद्धव यांचा पंकजांना रिप्लाय
SHARES

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबरला आपल्या पुढील वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट करेल, असं म्हटलं आहे. तर  दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. पंकजा मुंडेंची भूमिका १२डिसेंबरला स्पष्ट होईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या पार्श्वभूमीनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंच्या ट्विटला दिलेला रिप्लाय केंद्रस्थानी आला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर  पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं होतं. या ट्विटला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रिप्लाय दिला आहे. 

 उद्धव ठाकरे म्हणाले, आपले मनःपूर्वक धन्यवाद, पंकजा ताई मुंडे! ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो. 


पंकजा यांचं ट्विट

आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!! एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे ‘राज्याचे हित प्रथम ‘!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!’



हेही वाचा -

फडणवीसांच्या काळातील ६ महिन्यांच्या फाईल मागवल्या

आता यू टर्न नकोच, बुलेट ट्रेनबाबत मनसे आमदाराची भूमिका




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा