भाजपा आमदार मंदा म्हात्रेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

भाजपाच्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी रविवारी कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान लोकसभेसाठी मतदारांनी दोन ठिकाणी मतदान करण्याचं वादग्रस्त आवाहन केलं. रविवारी कोपरखैरणे सेक्टर ५ मध्ये भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी दोन ठिकाणी मतदान करण्याचं वादग्रस्त विधान केलं. या विधानानंतर त्यांच्याविरोधांत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार

ठाणे आणि सातारा या दोन्ही जागा शिवसेनेला देण्यात आल्या आहेत. २३ एप्रिलला नरेंद्र पाटील यांना मत देण्यासाठी मतदारांनी साताऱ्याला जावं आणि २९ एप्रिलला मतदारांनी राजन विचारे यांनाही मतदान करावं, असं विधान मंदा म्हात्रे यांनी कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान केलं. त्यांनी मतदारांना दोन ठिकाणी मतदान करण्याचं आवाहन केलं. यानंतर मंदा म्हात्रे यांच्याविरोधात आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.


हेही वाचा -

मुंबईत पालिकेनं हटवली ९ हजारपेक्षा अधिक बेकायदा होर्डिंग

'राज ठाकरेंनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच' – उर्मिला मातोंडकर


पुढील बातमी
इतर बातम्या