Advertisement

मुंबईत पालिकेनं हटवली ९ हजारांपेक्षा अधिक बेकायदा होर्डिंग

मागील दीड महिन्यात महापालिकेनं मुंबईतील ९ हजारपेक्षा अधिक बेकायदा होर्डिंग हटवली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात आचारसंहीता लागू झाली आहे.

मुंबईत पालिकेनं हटवली ९ हजारांपेक्षा अधिक बेकायदा होर्डिंग
SHARES
Advertisement

मागील दीड महिन्यात महापालिकेनं मुंबईतील ९ हजारपेक्षा अधिक बेकायदा होर्डिंग हटवली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात आचारसंहीता लागू झाली आहे. त्यामुळं आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी आचारसंहिता लागू झाल्यापासूनच पालिकेनं शहरातील बेकायदा होर्डिंग हटवण्याच्या विशेष अभियानाला सुरूवात केली असून, ९ हजार होर्डिंग्स हटवली आहेत.


८,६५७ बेकायदा होर्डिंग

आचारसंहिता लागू झाल्यानंर पहिल्याच दिवशी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी खाजगी आणि सार्वजनिक ठिकाणांहून १ हजार ५०० बेकायदा होर्डिंग, पोस्टर, बॅनर हटवली होती. तसंच, मागच्या एका महिन्यात महापालिकेनं सार्वजनिक ठिकाणांहून ८ हजार ६५७ बेकायदा होर्डिंग आणि ३५० होर्डिंग खाजगी ठिकाणांहून हटवली आहेत. 


होर्डिंग्स प्रकरणी तक्रारी दाखल

पालिकेच्या २४ वॉर्ड्सपैकी गोरेगांव (पी / दक्षिण) वार्डमधून सर्वाधिक १ हजार १२६ होर्डिंग हटवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, दहिसर (आर / उत्तर) वॉर्डमधून ७१४ बॅनर हटवले आहेत. तसंच, महापालिकेनं बेकायदा होर्डिंग्सच्या ४४ प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.हेही वाचा -

धारावीत इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू, ३ जण जखमी

मुंबईतील बोरीवली, मालाड परिसरात अवकाळी पाऊससंबंधित विषय
Advertisement