Advertisement

धारावीत इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू, ३ जण जखमी

मुंबईतल्या धारावी परिसरातील पीएमजीपी कॉलनीमधील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे.

धारावीत इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू, ३ जण जखमी
SHARES
Advertisement

मुंबईतल्या धारावी परिसरातील पीएमजीपी कॉलनीमधील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. 


कंत्राटदाराचा हलगर्जीपणा

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे या इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा पाइप रिक्षाचालकावर कोसळल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. तसंच, मोटारसायकलवरून जाणारी एक व्यक्तीही या अपघातात जखमी झाली.


रुग्णालयात दाखल 

अद्याप मृत रिक्षाचालक आणि जखमी तीन जणांची नावं समजली नसून, या तीन जणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ही घटना घडताचं पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं होतं.हेही वाचा -

राज कॉमेडियन, तर दादा हुलपट्टू; तावडेंचा उपरोधीक टोलासंबंधित विषय
Advertisement