Advertisement

राज कॉमेडियन, तर दादा हुलपट्टू; तावडेंचा उपरोधीक टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा स्टॅडअप कॉमेडी शो असल्याचं म्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांच्या सभेची खिल्ली उडवली आहे.

राज कॉमेडियन, तर दादा हुलपट्टू; तावडेंचा उपरोधीक टोला
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा स्टॅडअप कॉमेडी शो असल्याचं म्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांच्या सभेची खिल्ली उडवली आहे. शुक्रवारी त्यांचा नांदेडमध्ये शो पार पडला असून लवकरच उर्वरित महाराष्ट्रातही त्यांचे शो पार पडणार असल्याचं म्हणत त्यांनी राज यांना टोला लगावला.


त्यांचाच पक्ष संपलेला

राज ठाकरे हे सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना संपवण्याची भाषा करत आहेत. परंतु राज यांचा एकही खासदार, आमदार किंवा नगसेवकही नाही. त्यांचा स्वतःचाच पक्ष संपला असून आता ते दुसऱ्याला संपवण्याची भाषा करत असल्याचा टोला तावडे यांनी लगावला.


खर्च संबंधितांच्या खात्यात धरा

राज ठाकरे यांनी आपला उमेदवार उभा केला नाही. ते कोणत्याही उमेदवाराचा प्रचारही करत नाहीत. परंतु ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करत असल्यानं त्यांच्या सभांचा खर्च संबंधित उमेदवारांच्या खर्चात धरण्यात यावा यासाठी निवडणूक आयोगाकडं मागणी करणार असल्याचंही तावडेंनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणत्या पक्षानं द्यावा याची माहिती निवडणूक आयोगानं जनतेला देण्याची मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले.


अजित पवार हुलपट्टू

भाजपात ज्यांनी प्रवेश केला त्यांची कागदपत्रे आपल्याकडं असून निवडणुकांनंतर ती दाखवू असं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचाही तावडेंनी समाचार घेतला. अजित पवार हे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष असून त्या खेळात एखादा खेळाडू गडी बाद करता आला नाही तर समोरच्याला हूल देऊन येतो. अजित पवार यांचा हा हुल देण्याचाच प्रकार असल्याचं म्हणत त्यांना पवार यांना धारेवर धरलं.




हेही वाचा -

मनोज कोटक यांच्यासमोर तोगडीयांचा उमेदवार रिंगणात

लोकसभा निवडणूक: मुंबई, ठाणे, पालघरमधून १९४ उमेदवार रिंगणात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा