Advertisement

लोकसभा निवडणूक: मुंबई, ठाणे, पालघरमधून १९४ उमेदवार रिंगणात

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे जिल्हा आणि पालघर येथील दहा मतदारसंघांतून १९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांत एकूण ११६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

लोकसभा निवडणूक: मुंबई, ठाणे, पालघरमधून १९४ उमेदवार रिंगणात
SHARES

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे जिल्हा आणि पालघर येथील १० मतदारसंघांतून १९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मुंबईच्या ६ लोकसभा मतदारसंघांत एकूण ११६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस होता. यावेळी मुंबईतील ९, ठाणे जिल्ह्यातील ३ मतदारसंघांतून ९ आणि पालघरमधून ९ उमेदवारांनी माघार घेतली आहे.


९ उमेदवारांची माघार

शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९ उमेदवारांनी माघार घेतली आहे. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी २ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळं दक्षिण मुंबईत १३ तर दक्षिण मध्यमध्ये १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसंच, उपनगरातील ४ मतदारसंघांतून ५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. या चार मतदारसंघांत एकूण ८६ उमेदवार रिंगणात आहेत. यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील १८, उत्तर पश्चिम मुंबईत २१, उत्तर पूर्व मुंबईत २७ तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील २० उमेदवारांचा समावेश आहे. 


१५६ अर्ज दाखल

मुंबईतील ६ जागांसाठी ९ एप्रिलपर्यंत १५६ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १० एप्रिल रोजी दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातील १४ अर्ज छाननीत बाद झाले, तर ३४ वैध ठरले. तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांतील ११० पैकी १३ अर्ज अवैध ठरले होते. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून २५, उत्तर पश्चिम मुंबई २२, उत्तर पूर्व मुंबई २८ आणि उत्तर मध्यमधून २२ असे ९७ अर्ज वैध ठरले होते. ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांतून ९ उमेदवारांनी त्यांची उमेदवारी शुक्रवारी मागे घेतली आहे. यामुळे या तिन्ही मतदारसंघांत आता ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 



हेही वाचा -

राजधानी एक्सप्रेसच्या बदलत्या वेळामुळं प्रवासी हैराण

कुर्ला स्थानकावरील 'त्या' लिबू सरबत विक्रेत्याला ५ लाखांचा दंड



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा