Advertisement

राजधानी एक्स्प्रेसच्या बदलत्या वेळामुळं प्रवासी हैराण

गेल्या काही महिन्यांपासून राजधानी एक्स्प्रेसचं वेळापत्रक सतत बदलत आहे. त्यामुळं प्रवाशांची गौर सोय होत असून बदलते वेळापत्रक त्रासदायक ठरत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

राजधानी एक्स्प्रेसच्या बदलत्या वेळामुळं प्रवासी हैराण
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरून नाशिकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते हजरत निजामुद्दीन अशी मुंबई ते दिल्ली पहिली राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. या एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळं वेळेत बचत करण्यासाठी २४ प्रवासी डबे घेऊन ताशी १०० ते १४० किमी वेगाने धावण्याची क्षमता असलेले 'वॅप ७' हे आधुनिक इंजिन पुश-पूल पद्धतीसाठी वापरण्यात आलं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून राजधानी एक्स्प्रेसचं वेळापत्रक सतत बदलत आहे. त्यामुळं प्रवाशांची गैरसोय होत असून बदलते वेळापत्रक त्रासदायक ठरत असल्याचं प्रवाशांनी म्हटलं आहे.


वेळापत्रकात बदल

पश्चिम रेल्वेवर राजधानी एक्स्प्रेसच्या दोन गाड्या धावतात. मात्र, मध्य रेल्वे मार्गावरून नाशिकमार्गे मुंबई ते दिल्ली पहिली राजधानी एक्स्प्रेस १९ जानेवारीला सुरू करण्यात आली. त्यामुळं नाशिक-धुळे-जळगावमधील प्रवाशांना दिलासा मिळाला. मध्य रेल्वेवरील राजधानी एक्सप्रेस गाडी क्रमांक २२२२२ निजामुद्दीनवरून दर आठवड्याला गुरुवारी आणि रविवारी सुटते. परंतु, या गाडीतील फलकावर शुक्रवार आणि सोमवार या दिवशी एक्स्प्रेस सुटत असल्याचं दाखविण्यात येतं. त्यामुळं एक्स्प्रेसचं आरक्षण करताना प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. 

दरम्यान, सीएसएमटीहून गाडी क्रमांक २२२२१ ही दर बुधवारी आणि शनिवारी सीएसएमटीहून दिल्लीसाठी रवाना होतं असून या गाडीची वेळ दुपारी २.५० वाजता आहे. मात्र, मागील काही महिन्यापासून दुपारी २.५० वाजता सुटणारी गाडी ४.१० मिनिटांनी सुटत आहे.हेही वाचा -

कुर्ला स्थानकावरील 'त्या' लिबू सरबत विक्रेत्याला ५ लाखांचा दंड

मनोज कोटक यांच्यासमोर तोगडीयांचा उमेदवार रिंगणातRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा