आशिष शेलारांनी का घेतली राज ठाकरेंची भेट?

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवाजी पार्कवर महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका करत 'मोदीमुक्त भारत’चा नारा दिला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसेची भूमिका मोदीविरोधी-भाजपविरोधी असेल असं वाटत असतानाच शनिवारी राज ठाकरे यांची भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भेट घेतली.

शनिवारी सकाळी शेलार यांनी कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेतली. मात्र या भेटीत दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेलारांच्या घरी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत नेमकं काय झालं हे अद्यापही समोर आलेलं नाही. असं असताना आता शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.


हेही वाचा

कमळाच्या गोटात घड्याळाची टिकटिक! पवारांनी घेतली शेलारांची भेट

पुढील बातमी
इतर बातम्या