Advertisement

कमळाच्या गोटात घड्याळाची टिकटिक! पवारांनी घेतली शेलारांची भेट


कमळाच्या गोटात घड्याळाची टिकटिक! पवारांनी घेतली शेलारांची भेट
SHARES

भाजापानं शिवसेनेकडे टाळीसाठी हात पुढं केला असून सेनेच्या टाळीची प्रतिक्षा असतानाचा आता भाजपाच्या गोटात टीकटीक सुरू झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भापजा अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली आहे. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात असलं, तरी राजकीय वर्तुळात मात्र आता चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.


भाजपाला टाळीची प्रतिक्षा

नुकत्याच झालेल्या भाजपाच्या महामेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'सेनेला सोबत घेतच २०१९ च्या निवडणुका लढू' असं सांगत सेनेकडे टाळीसाठी हात दिला आहे. सेनेनं मात्र टाळी देण्यास नकार दिला असला, तरी भाजपानं हार मानलेली नसून अजूनही टाळीसाठी प्रयत्न सुरू आहेत.


भेटीमागे राजकीय खेळी?

असं असताना पवारांनी अचानक शेलारांची भेट घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आणि केंद्रातील राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या भेटीचं विशेष महत्त्व मानलं जात आहे. ही राजकीय खेळीही असू शकते, असं म्हटलं जात आहे. पवारांची कोणतीही राजकीय भेट कारणाशिवाय नसते, असा आजपर्यंतचा अनुभव असल्यामुळे या भेटीमागे काय राजकीय गणित असू शकेल, याविषयी तर्कवितर्क सुरू झाले आहेत.



हेही वाचा

पाडवा सभेआधी राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा