Advertisement

पाडवा सभेआधी राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट


पाडवा सभेआधी राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट
SHARES

राज ठाकरे पाडव्याच्या मुहूर्तावर मनसे मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. मात्र त्याच्या तयारीसाठी त्यांनी चक्क शरद पवार यांची मदत घेतली आहे अशा चर्चांना आज उधाण आले आहे. त्यामागचे कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट. सकाळीच राज ठाकरे मुंबईतील पेडर रोड येथील पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी दाखल झाले.


भेटीचं नेमकं कारण काय?

राज ठाकरे - शरद पवार यांच्या भेटीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या भेटीचं नेमकं निमित्त काय? याचे अंदाज राजकीय वर्तुळात बांधण्यास सुरुवात झाली आहे.


महामुलाखतीनंतर नवी समीकरणं?

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि शरद पवार यांची ‘महामुलाख’ झाली होती. तेव्हापासूनच महाराष्ट्रात नवी समीकरणं पाहायला मिळतील का? अशी चर्चा सुरु होती. आता राज ठाकरे स्वत: शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.


शरद पवारांच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मुलाखतीनंतर भेट झाली नव्हती. त्यामुळे ही सदिच्छा भेट होती.

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे


गुढी पाडव्याला नव्या समीकरणांची गुढी?

उद्या गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. या सभेतून राज ठाकरे राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचसोबत, पक्षाची पुढील वाटचालही मांडणार आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही भेट असेल का? आणि असेल तर पवारांशी नेमकी काय चर्चा होईल? याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. राज ठाकरे यांनी मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं आहे.



हेही वाचा

भाजपासारखी बोगस नोंदणी नको- राज ठाकरे


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा