Advertisement

'राज ठाकरेंनी पवारांकडून नीट धडे घेतले नाहीत'

'सुट्टीच्या दिवशी जमलेल्यांचं चांगलं मनोरंजन झालं. या देशातील माध्यमं स्वतंत्रच आहेत. पवारांकडून नीट धडे घेतलेले दिसत नाहीत. मनसेला भाव देत नाही, म्हणून माथी भडकावली जाऊ नयेत', असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.

'राज ठाकरेंनी पवारांकडून नीट धडे घेतले नाहीत'
SHARES

राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या निमित्तानं दादरमध्ये घेतलेल्या सभेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. भाजप आमदार राम कदम, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी करमणूक केल्याची टीका भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे.


काय आहे ट्विट?

'सुट्टीच्या दिवशी जमलेल्यांचं चांगलं मनोरंजन झालं. या देशातील माध्यमं स्वतंत्रच आहेत. पवारांकडून नीट धडे घेतलेले दिसत नाहीत. मनसेला भाव देत नाही, म्हणून माथी भडकावली जाऊ नयेत', असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.


'राज ठाकरेंनी स्तर पाहून बोलावे'

तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंवर टीका केली आहे. 'ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केलं, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली आहेत', अशा शब्दांत आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. ‘मोदीमुक्त भारत’ हे जरा जास्तच झालं, राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावं', असा खोचक टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.'राज ठाकरेंच्या भाषणावर पवारांचा प्रभाव'

'विधानसभा ‘मनसेमुक्त’ झाली, मुंबई महापालिकेतील उरले-सुरले नगरसेवकही पळून गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही', असे आशिष शेलार म्हणाले. तसेच, 'याआधी राज ठाकरेंच्या भाषणांवर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा, हल्ली शरद पवारांचा दिसतो', असाही टोला त्यांनी लगावला.


राष्ट्रवादी राज ठाकरेंच्या पाठिशी!

दरम्यान, भाजपकडून जरी राज ठाकरेंच्या आरोपांचा समाचार घेतला जात असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र राज ठाकरेंच्या मुद्द्यांना पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांना जवळ गेल्यानंतर कळलं की पंतप्रधान मोदी हे कसे आहेत. असो..देर आए दुरुस्त आए! वर्षानुवर्षे आम्ही जे सांगतो ते राज ठाकरे बोलल्यावर गांभीर्याने घेतलं गेलं. हिंदू-मुस्लिम एकमेकांशी लढवल्याशिवाय भाजप जिंकू शकत नाही. देश तुटला तरी चालेल पण सत्ता मिळाली पाहिजे हे भाजपचे धोरण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीटरवर केली आहे.
हेही वाचा

महाराष्ट्रात फक्त मराठी, नाहीतर खळ्ळखट्याक


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा